टॉप न्यूज
पर्यटन विकास महामंडळाच्या अक्कलकोट सदनाची मोठी दुरावस्था

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
पर्यटन विकास महामंडळाचे अक्कलकोट येथील सात एकर जागेवर लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला सदनाची मोठी दुरावस्था झाली आहे. इमारतीला तडे गेले आहेत . एकडीकडे भाविकाना थंडीमध्ये निवासाची प्रसाधन गृहाची अपुरी सोय याला सामोरे जावे लागत आहे दुसरी कडे अनेक वर्षापासून पर्यटन विकास महामंडळाचे अक्कलकोट येथील सदनाकडे अक्षम्य दुर्लक्षा बद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिव्हा उपप्रमुख सुनिल कटारे यांनी
विभागीय कार्यालय, नागपुर येथील पर्यटन विकास, महामंडळाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. याची दुराअवस्था दुर करा पर्यटकाना सदन त्वरीत चालु करा अन्यथा २६ जाने २०२५ पासुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .
सदर निवेदनाच्या प्रती माहिती स्तव तहसिलदार जिल्हाधिकारी उत्तर पोलीस याना देण्यात आल्या आहेत .
तहसिल कार्यालय समोर आय.टी.आय कॉलेज लगत ७ एकर जमीन वर पर्यटन विकास महामंडळाने डाक बंगल बाधला आहे. त्यात ७ खोली बांधलेले आहेत. ८० खोलीचे नियोजन आहे. शेजारी किचन रुम अर्धवट बांधलेले आहे. नियोजित डाक बंगल्याला तडे गेले आहेत.
रेस्ट हाऊस मागील बाजूस एक मंगल कार्यालय बांधले आहे.एक मोठे हॉल, ५ छोटे हॉल आहेत. एटीडीसी या शासनाचे कंपनीने दुर्लक्ष केले. सदर ठिकाणी येणे जाणे साठी रस्तेचे व्यवस्था नाही. पाण्यचे नियोजन नाही.लाईटचे नियोजन नाही. त्यात ७ एकर मधील सर्व बिल्डींग धोका दायक स्थितीमध्ये आहेत .
सदर जागा पर्यटनासाठी योग्य आहे.पण नियोजन योग्य न झाल्याने प्रशासनास भुर्दंड पडला असल्यासचे दिसते. तरी पर्यटन क्षेत्र चालू करुन स्वामी भक्तांना त्यांचा उपयोग व्हावा व शासकिय कामासाठी सुध्दा उपयोगात आणावा.अक्कलकोट सुंदर दिसावे हि दूरदृष्टी ठेवून नियोजन करण्यात यावे. ह्या ७ एकर क्षेत्रात घाणींचे साम्राज्या आहे. ह्यामुळे सदर ठिकाण शोधून काढणे अवघड झाले आहे.
सदर प्रकरणी संबंधीतानी तात्काळ लक्ष घालून योग्य अशी कारवाई करावी. अन्यथा २६ जानेवारी रोजी तहसिल कार्यालय अथवा ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट येथे उपोषणांस बसणार असल्याचा इश्वरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख सुनिल कटारे यांनी निवेदनात दिला आहे- .