Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हक्क आणि कर्तव्याची जाणीव स्त्री ला असावी   –     रेखा सोनकवडे       

Admin by Admin
December 28, 2024
in सामाजिक
0
हक्क आणि कर्तव्याची जाणीव स्त्री ला असावी   –     रेखा सोनकवडे       
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

                           अक्कलकोट ( प्रतिनिधी )महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली सोलापूर जिल्ह्या अध्यक्षा सौ .रेखा लक्ष्मण सोनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली .सोलापूर जिल्हा सम्पर्कप्रमुख नीलावती केदार यांनी केलेल्या कामाचा आढावा दिला .जिल्हा सचिव छाया कुलकर्णी यांनी पुढील कामाची रूपरेषा सांगितली .जिल्हा उपाध्यक्ष रेखा हिरेमठ  यांनी मार्गदर्शन केलं .उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षा संध्या सरवदे उपाध्यक्षा शिला हावळे सचिव विद्या साबळे  दक्षिण सोलापूर अध्यक्षा भंगारेव्वा सोनकडे यांनी केलेल्या कामाचा  आढावा दिला व महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली या संघटनेच्या माध्यमातून महिला मुलीसाठी बरीच कामं करायची आहेत .न्याय मिळवुन देणे किंवा अडचणीतून मार्ग दाखवणे इत्यादी कामं करत आहोत आणि करायची आहेत  असे सर्व पदाधिकाऱ्यानी सांगितले .या संघटनेमुळे आमची स्त्री म्हणून स्त्रियासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे ती सार्थकी लाऊ आणि आम्हाला समाधान मिळत आहे असेही बोलताना म्हणाल्या .                 समाजात अनेक गोष्टी आपण पाहत असतो .स्त्रियांवर होणारे कौटुंबिक मानसिक शारीरिक  छळ होतो .सासू सुनेला छळते कुठे सून सासूला .घराघरात अवतीभोवती घडणाऱ्या अश्या गोष्टी आपण नजरेआड करतो .कुठे शाळा कॉलेजमधे मुलींना छेडले जाते त्रास दिला जातो गल्लीबोळात पण लहान मुलींवर अत्याचार झालेले आपण ऐकतो या सर्व गोष्टी मनाला वेदना देणाऱ्या आहेत .अश्या गोष्टीना समाजाने पण आळा घालायला मदत केली पाहिजे .महिला सुरक्षा संघटनेच्या माध्यमातून महिलांवर होणारे अन्याय दूर करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे असे मार्गदर्शन करताना रेखा सोनकवडे म्हणाल्या .         प्रत्येक स्त्रीजातीला आपल्या हक्काची व कर्तव्याची जाणीव व्ह्यायला हवी .मी महिला म्हणून दुसऱ्या महिलेचे दुखः जाणून घेता यावे समजून घेता यावे .मदत करण्याची भावना निर्माण व्हावी म्हणजेच स्त्री म्हणून स्त्रीच्या कामी यावे याहून दुसरा आनंद नाही .महिला सुरक्षा संघटनेच्या माध्यमातून     मुलींना महिलांना जागरूक करू या .अन्यायाला वाचा फोडण्याची ताकद निर्माण करू या असेही सोलापूर जिल्हा अध्यक्षा रेखा सोनकवडे म्हणाल्या .            महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष किसनराव काशीद पाटील यांनी फोनसंदेशाद्वारे सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन करताना म्हणाले की ही संघटना भारतभर काम करते .महिला महिलांसाठी फार चांगली कामं करतात हे भूषणावह आहे .आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी दुर्लक्षित न करता त्याला न्याय मिळेल असा प्रयत्न सर्वांचा असावा .स्त्रीला सर्वत्र मान सन्मान मिळावा तिला जगण्याचा अधिकार असावा यासाठी आपला महिला सुरक्षा संघटना नवी दिल्लीच्या सर्व पदाधिकाऱ्यानी कामं कराव यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या .          अनेक विषयावर चर्चा होऊन महिला सुरक्षा संघटनेची आढावा बैठक सम्पन्न झाली .

Previous Post

माजी उपनगराध्यक्ष नागराज माशाळे यांचे निधन 

Next Post

पर्यटन विकास महामंडळाच्या अक्कलकोट सदनाची मोठी दुरावस्था

Admin

Admin

Next Post
पर्यटन विकास महामंडळाच्या अक्कलकोट सदनाची मोठी दुरावस्था

पर्यटन विकास महामंडळाच्या अक्कलकोट सदनाची मोठी दुरावस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (44)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156989
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697