सामाजिक
साहित्यरत्न ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त बैठक संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने सालाबादा प्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे १०५ व्या जयंती बैठक मातंग समाज अध्यक्ष सुनिल खवळे यांच्या अध्यक्ष खाली पार पडली .या बैठकीमध्ये कार्यकारिणी निवड करण्यात आली साहित्यरत्न , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव समिती चे नूतन अध्यक्ष श्रीपाद खवळे यांची एक मतांनी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी आदिनाथ कांबळे , सेक्रेटरी समर्थ देवकुळे , सह सेक्रेटरी जनार्दन शितोळे , खजिनदार प्रेम केंदळे , सह खजिनदार तानाजी खवळे , कार्याध्यक्ष समर्थ खंदारे , मिरवणूक प्रमुख बाबाजी कांबळे ,दगडु पारखे , अनिल केंगार ,बाळू क्षीरसागर ,विकास हातागळे ,सचिन ऐवळे ,दत्ता बनसोडे ,राहुल गिजगे ,आधारस्तंभ- अनिल गवळी नामदेव क्षीरसागर अंबादास कांबळे ठकशेन शितोळे , राजू बनसोडे ,राहुल देविदास क्षीरसागर , राजू देडे , माजी नगरसेवक विकास मोरे आदींचे निवड करण्यात आली. अविनाश पारखे यांनी आभार मानले. जयंती उत्सव समितीच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यानां शुभेच्छा देण्यात आल्या.



