राजकीय

काँग्रेस महाआघाडीचा पदयात्रेने प्रचाराचा समारोप म्हेत्रेच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद

महायुती सरकारने शेतकऱ्याच्या मालाला भाव दिले नाही पण मालावर टॅक्स लावले- सिद्धाराम म्हेत्रे
         अक्कलकोट ( प्रतिनिधी )
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देतो म्हणणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालावर टॅक्स लावले. राज्यातील महायुती सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली. खोटे बोलणाऱ्या सरकारांना मुळासकट उकडून बाहेर टाका असे सिद्धाराम म्हेत्रे  म्हणाले.
   काँग्रेस महाविकास आघाडी  उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे याच्या प्रचारार्थ अक्कलकोट शहरातुन सोमवारी भव्य पदयात्रा काढण्यात आली.या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांनी फुलांचा वर्षाव केले. यावेळी माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबु, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, काँग्रेस शहर अध्यक्ष रईस दिनवाला, लाला राठोड, अश्पाक बरोळगी, शीतलताई म्हेत्रे, लक्ष्मीताई म्हेत्रे, सुनिता हडलगी   आदी उपस्थित होते.
        पुढे बोलताना सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, तालुक्यात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असताना या सरकारने बेरोजगाराकडे दुर्लक्ष केले. राज्यातील मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला पाठवले. विकास कामे केवळ कागदावर दाखवून मोठा गाजावाजा केले. महायुती सरकार गरिबांचे नसून श्रीमंताचे आहे. जाती धर्मामध्ये भांडणे लावणे हा  त्यांचा मुख्य उद्देश आहे. अशा लोकांना सत्तेतून बाहेर फेकून देण्यासाठी २० तारखेला हाताच्या पंजावर बटन दाबा अशी  विनंती केली.
अक्कलकोट शहरातील मुख्य मार्गावरून पदयात्रा पार पडली. पदयात्रेची सुरूवात एवन प्रमिला पार्क  काँग्रेस भवन येथुन सुरूवात होऊन खंडोबा मंदिर, बसस्थानक, कारंजाचौक, बाजारपेठ  मुख्यरस्ता, फत्तेसिंह चौक, नाईकवाडी गल्ली, कुंभार गल्ली मार्गे एवन प्रमिला पार्क येथे सभेत रूपांतर झाले. यावेळी मल्लिकार्जुन पाटील, अश्पाक बळोरगी, व्यंकटेश मोरे यासह आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या पद यात्रेत अक्कलकोट शहरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  यात्रेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button