सामाजिक

छोटे किल्लेदार, जय हिंद फूड बँकेचा सोलापूर मधील उपक्रम ,सहभागी होण्या साठी आवाहन

 

सोलापूर ( प्रतिनिधी )अभिमान वाटावा असा आपला इतिहास आहे, तो जितका वैभवशाली आहे, सृजनात्मक आहे, कलाक्रिडा, साहित्य, संगीत हा जसा आपला इतिहास आहे तसाच तितकाच संघर्षाचा, शौर्याचा आणि पराक्रमाच्य पराकाष्टेचा देखील आपला इतिहास आहे. आपल्या याच संघर्षाच्या, शौर्याच्या इतिहासाचे प्रतीक आहे आपले किल्ले. महाराष्ट्राच्या इतिहासातील संघर्षाच्या काळाचे मुक साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची ओळख, सदैव स्मरण आणि त्यातुन उज्वल भविष्याची प्रेरणा आपणास मिळत रहावी म्हणुनच दिवाळीमध्ये अंगणात किल्ला बनविण्याची सार्थ परंपरा आपल्याकडे सुरु झाली.

आपल्या मुलांनी किल्ला जाणावा, त्यातील बारकावे जाणावेत, त्याचे स्थापत्य जाणावे आणि स्वतःच्या हाताने दगडमातीने किल्ला बनवावा यासाठी जय हिंद फूड बँकेच्या स्पर्धा मध्ये मुला-मुलींना अवश्य पाठवा. या स्पर्धेत किल्ला बांधणे या विषयासोबतच इतर अनेक उपक्र्म, सर्वांगिण विकास, निखळ आनंद, धाडस, धैर्य, सहजीवन, परस्परावलंबन अशी अनेक मुल्ये स्पर्धेत शिकतात.

स्पर्धा 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत आहे.

किल्ला स्पर्धा प्रवेश विनामूल्य आहे,

आजच नाव नोंदवा….

स्थळ – भावना ऋषी पटांगण अशोक चौक सोलापूर.

स्पर्धा प्रमुख मनाली तमशेट्टी 9607681837

जय हिंद फूड बँक 9665808571

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button