शैक्षणिक
अक्कलकोट येथे बौद्ध समाजातील १० व १२ उत्तीर्ण विद्यार्थी – विद्यार्थीनीच्यां सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अक्कलकोट शहर व तालुक्यातील बौद्ध समाजातील २०२५ साली १० व १२ वीतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार कार्यक्रम दिनांक २१ जून २०२५ रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता बॅगेहळळी रोड वरील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. तरी अक्कलकोट तालुक्यातील बौद्ध समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी या कार्यक्रमासाठी ९४०४०३३८५० ,७७१८९०२१७९ , ८२७५२०९३९६ ,७५०७६३४४१५ ,९९२२५२६३८९ ,९५९५२९३९७२ या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा ध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांनी केले आहे.