Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट – सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या वृक्ष संवर्धनाकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे  दुर्लक्ष !

Admin by Admin
January 9, 2025
in टॉप न्यूज
0
अक्कलकोट – सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या वृक्ष संवर्धनाकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे  दुर्लक्ष !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गा लगतच्या वृक्ष संवर्धनाकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने पर्यावरण प्रेमी नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने अक्कलकोट – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षसंवर्धनाकडे लक्ष देण्याची गरज भासत आहे.
 अक्कलकोट – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग निर्माण करत असताना या महामार्गावरील हजारो झाडे तोडण्यात आली. यामध्ये वड , पिंपळ ,लिंब यासह विविध पर्यावरण पूरक वृक्षांची तोड करण्यात आली. अक्कलकोट – सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग सध्या जनतेच्या सेवेत सुरू आहे. या चार पदरी महामार्गालगत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये वड , पिंपळ ,कडूलिंब आदी पर्यावरण पूरक वृक्षांसह इतर सावली देणाऱ्या वृक्षांचे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे .पण  या वृक्षांच्या संवर्धनाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. अक्कलकोट – सोलापूर महामार्गावरील वृक्ष हे पाण्याअभावी वाळून गेले आहेत. वृक्ष संवर्धनाकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाले आहे. वास्तविक पाहता सदरचा महामार्ग बनवत असताना जितके वृक्ष तोडण्यात आले त्याहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे जतन करणे गरजेचे होते .पर्यावरण पूरक वृक्षांचे संवर्धन होणे गरजेचे असताना राजमार्ग प्राधिकरणाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे सध्याच्या परिस्थितीकडे पाहून वाटत आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या या दुर्लक्षामुळे पर्यावरण प्रेमी नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वास्तविक पाहता पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी आणि जमिनीची धूप थांबविण्यासाठी महामार्गालगत हजारो वृक्षांचे संवर्धन झाले पाहिजे. अक्कलकोट – सोलापूर महामार्गावर मात्र प्रवास करताना वृक्षांची झालेली अवस्था पाहून या अनास्था बद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. अक्कलकोट – सोलापूर या महामार्गावर संस्थान काळात हजारो वृक्षांचे संवर्धन भोसले राजघराण्यातील संस्थानिकांनी केले होते. यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना झाडांची सर्वत्र असलेली  सावली सर्वांनाच विसावा देत होती. भोसले राज घराण्याने वृक्ष संवर्धनाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले होते. अक्कलकोट ते हन्नूर या रस्त्यावर देखील राजघराण्याकडून हजारो वृक्षांचे जतन करण्यात आले होते.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने अक्कलकोट –  सोलापूर महामार्गावरील वृक्ष संवर्धनासाठी विशेष लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून केली जात आहे. 
चौकट – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पर्यावरण प्रेमी जन्मेजयराजे भोसले यांनी अक्कलकोट – सोलापूर महामार्गावर वड ,पिंपळ कडूलिंब यासह शेकडो  झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धनाचे काम करत आहेत. दिवसातून एकदा या झाडांना टँकरद्वारे पाणी घालण्यात येत आहे. यामुळे अक्कलकोट – सोलापूर महामार्गावर झाडांची दाटी पहावयास मिळत आहे .ती जन्मेजयराजे भोसले यांच्यामुळेच दिसत आहे. याचा आदर्श भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने घ्यावा असे पर्यावरण प्रेमी नागरिकांत बोलले जात आहे.
Previous Post

पत्रकार बी. आर. पांचाळ राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित

Next Post

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विशाल परदेशी यांची निवड

Admin

Admin

Next Post
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विशाल परदेशी यांची निवड

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विशाल परदेशी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697