सामाजिक

अक्कलकोट लिंगायत पंचमसाली समाज संघटनेची स्थापना

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
लिंगायत पंचमसाली समाज संघटनेची स्थापना अक्कलकोट येथे करण्यात आली, समाज संघटनेच्या स्थापनेसाठी ची बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे निमंत्रक आनंद बुक्कानवरे व बाबासाहेब पाटील यांनी बोलवली होती या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली पंचमसाली समाजाचा प्रगतीसाठी आणि विकासासाठी ही संघटना काम करेल, समाजचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक हित जोपासण्याचे काम ही संघटना करेल. बैठकीमध्ये सामुदायिक विवाह, समाजातील गरीब विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत, कायदेशीर मदत, यासारख्या गोष्टींवर चर्चा झाली, कुठल्याही राजकीय पक्ष किंवा कुठल्याही राजकीय नेत्याला संघटना बांधील राहणार नसल्याचं बैठकीत निमंत्रकांनी सांगितले. समाज संघटित करून त्यातून नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करू असे सर्व बैठकीतील मान्यवरांनी आपले मत मांडले, बैठकीला व्हिडिओ कॉल द्वारे श्री. जय मृत्युंजय पंचमसाली जगद्गुरु यांनी अमृतवचन व्यक्त केले. सदर संघटनेचे निमंत्रक व प्रमुख मान्यवर हे गावोगावी समाज संघटनेसाठी बैठका घेणार व पुढील बैठकीत पदाधिकारी निवड करायचे ठरले. सदर बैठकीला निमंत्रक आनंद बुक्कानवरे, निमंत्रक बाबासाहेब पाटील, विश्वनाथ भरमशेट्टी, शिवसिद्ध बुळा, रवि वरनाळे,शिवानंद पाटील, लक्ष्मीपुत्र बिराजदार,  मल्लिनाथ भासगी, नरेंद्र पाटील, शांतिवीर कळसगोंडा, विनायक प्रचंडे, मल्लिनाथ नागशेट्टी, म्हंतेश हत्तुरे, मल्लिनाथ अरवतकल, विष्णू येळमेली, चिदानंद परमशेट्टी, देवेंद्र जकापुरे, विनीत पाटील,शरण ढेपे, ओंकार बिराजदार, रतन बिराजदार, विरेश धनशेट्टी, शिवशरण इचगे, शिवानंद बिराजदार यांचा सह समाजबांधव मोठा संख्येने उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button