मोहोळ शहर काँग्रेसच्यावतीने नेत्र तपासणी शिबीर संपन्न

मोहोळ -मोहोळ शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शालोमन पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पाच याठिकाणी एच्.व्ही.देसाई नेत्रालय संचलित एका संस्थेच्या सहकार्याने आज नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले होते.
सदर नेत्ररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन मोहोळ शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अंजली वस्त्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मोहोळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश हावळे, मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष केरबा गाढवे, शहर सचिव सुनिल टिळेकर, शेतकरी संघटनेचे नेते नानासाहेब मोरे, मोहोळ विधानसभा मतदारसंघ सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अविनाश कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली मोहिते, अभिजीत नेटके, शहर सचिव हरिभाऊ गायकवाड, सर्जेराव जाधव, धनाजी कांबळे, दत्तात्रय हजारे, रघुराज भोसले, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित राहिले होते.
यावेळी प्रभाग क्रमांक पाच येथील अनेक नागरिकांची नेत्र तपासणी करून काहीजणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. एच्.व्ही. देसाई रुग्णालयाच्या नेत्रतज्ञ मंजिरी पाटील व, साहाय्यक कृष्णा जाधव यांनी सदर रुग्णांच्या तपासण्या केल्या.