राजकीय
राज्यात महाविकास आघाडीचीच घोडदौड ? लोकपोलचा सर्व्हे

मुंबई -: राजकीय मुद्यांवर सर्वे क्षण, अंदाज, मतचाचणी अशा विविध गोष्टींवर काम करणा- या लोकपोलने केलेल्या सर्व्हे चे निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी बहुमत मिळवू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महायुतीला दुस-या क्रमांकाच्या जागा मिळतील. मात्र, सत्ता स्थापनेसाठी त्या अपु-या असतील, असेही या
जागा निष्कर्षांत दिसून आल्याचा दावा लोकपोलने केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही राज्यात होणार लोकसभेचीच पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकपोलने या निष्कर्षांबरोबरच हा सर्व्हे नेमका कसा करण्यात आला, याची माहिती दिली आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून ५०० मतदार अशा प्रकारे राज्यभरातील मतदारसंघातून जवळपास दीड लाख मतदारांचा या सर्व्हेमध्ये समावेश करण्यात आला होता. मतदार निवडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील ३० मतदान केंद्रे निवडण्यात आली. २० ते ३० ऑगस्ट या १० दिवसांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. महाविकास आघाडीला १४९ ते १५४ जागा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १४१ ते १५४ जागा मिळतील तर सत्ताधारी महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळू शकतील. अपक्ष व इतर छोट्या पक्षांच्या मिळून ५ ते १८ जागा महाराष्ट्रात जिंकून येऊ शकतात. या आकडेवारीनुसार राज्यात महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्यात यश मिळू शकेल, असे दिसून येत आहे.
