सामाजिक
रंग जल्लोषच्या गीतांनी घातली अक्कलकोटकराना भुरळ !

सारेगम फेम अभिजित कोंसबी व सहकलाकारांकडून अप्रितम गीत गायन
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – विवेकानंद प्रतिष्ठानच्यावतीने प्रियदर्शिनी सांस्कृतिक भवन येथे गणेशोत्सव सांस्कृतिक व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना सारेगम फेम प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी सहकलाकारांनी भक्ती गीत उडत्या चालीची मराठी गौळण हिंदी चित्रपट गीते रसिक श्रोत्यांच्या ओठावरील अविट गीत सादर करून रसिक श्रोत्यांची मोठी वाहवा मिळवली . रसिक श्रोत्यांनां ठेका धरायला लावला .
प्रारंभी रंग जल्लोष मराठी हिंदी गीताच्यां कार्यक्रमाचा प्रारंभ देवा श्री गणेशाने करून गणेश भक्ताची चेतना जागवली .
प्रारंभी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी अभिजित कोंसबी अशोक येणगुरे स्वप्निल रास्ते अमिता घुगरी अबोली गिऱ्हे आदि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्री स्वामी समर्थााच्या प्रतिमा पुजन करण्यात आले . संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले प्रसिध्द
गायक अभिजित कोंसबी व सहकलाकारांचा सत्कार करण्यात आला .यावेळी गणेश वंदना
दही दुध लोणी कशी मी जाऊ बाजारी उडत्या चालीची गौळण साऱ्यांना ठेका धरायला लावली .
अभिजित कोंसबीनीं ‘अरुणोदय झाला ‘ गीतानी छत्रपती शिवरायांचा जयजयकार ऐकविला . ‘ जीवा शिवाची बैल जोड ‘ शेतकरी बांधवां साठी मोठ्या खुबीने सादर केल . ‘ ‘गालावर खळी डोळ्यांत धुंदी ‘ ने टाळ्यांची साद मिळवली . . .गोंधळ मांडला आई भवानी ‘ अंबे भक्तानां गीत सादर केल . अश्विनी ये ना हे गीत सादर करण्यात आले.
हिंदी गीतांमध्ये बाहोमें चले आओ , ओ परदेशी आ , मोनिका माय डार्लिंग यासह विविध गीते सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. खंडेराव घाटगे यांनी केले. यावेळी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष, तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, मल्लिनाथ कल्याणशेट्टी, शांभवी कल्याणशेट्टी, गुरूपादप्पा आळगी, मल्लिनाथ मसुती, अशोक येणगुरे, विलास कोरे, राजशेखर मसुती, अभिजित लोके, चंद्रकांत दसले, ओमप्रकाश तळेकर , रमेश वाले , भिमराव साठे , मुकुंद पत्की ‘निलकंठ कापसे, संतोष जिरोळे , मनोज कल्याणशेट्टी,धनंजय गाढवे , डॉ विपूल शहा , श्रीकांत झिपरे , डॉ राजु मलंग , ओंकार पाठक , यांच्यासह नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. रसिक श्रोत्यांनी सभागृह खचाखच भरले होते .
