टॉप न्यूज

महाराष्ट्राचे माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्व. डॉ. पतंगराव कदम  यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

 

सांगली -महाराष्ट्राचे माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्व. डॉ. पतंगराव कदम  यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा कॉंग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या शुभ हस्ते आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष  मल्लिकार्जुन खरगे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार  काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी  रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. खा. मुकुल वासनिक, माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे , काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री . आ. पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते  आ. विजय वडेट्टीवार, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  आ. जयंत पाटील, विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते . आ. सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.असंख्य नागरिकांच्या साक्षीने झालेला हा दिमाखदार हृदयस्पर्शी सोहळा अविस्मरणीय ठरला. स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी अनेक विकास कामांच्या माध्यमातून पलूस-कडेगाव मतदारसंघासह सांगली जिल्ह्याचा कायापालट घडवून आणला. स्व. डॉ. पतंगराव कदम यांना त्यांच्या राजकीय वाटचालीत श्रीमती इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते , सोनिया गांधी आदींचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. स्व. डॉ. पतंगरावजी कदम साहेबांपासून कदम परिवाराचे कॉंग्रेस पक्ष व गांधी परिवाराशी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे नाते कायम आहे.  खा. राहुलजी गांधी हे देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढा देत आहेत. केवळ सांगली जिल्हा व महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश या लढाईत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमास स्व. डॉ. पतंगराव कदम  यांच्यावर मनापासून प्रेम करणारे सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button