सामाजिक
श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद उत्सव आनंदात साजरे करा – उपोअ विलास यामावर

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
गुरुवार दि. ५ सप्टेंबर रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेच्या वतीने श्री.गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद २०२४ उत्सवाचे अनुषंगाने अक्कलकोट उपविभागातील श्री. गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, ईद-ए-मिलाद समितीचे मुस्लिम समाजाचे पदाधिकारी तसेच शांतता कमिटीचे सदस्य यांची सयुक्त बैठक मल्लिकार्जुन मंगल कार्यालय,अक्कलकोट येथे .विलास यामावर , उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग अक्कलकोट यांचे अध्यक्षेतेखाली आयोजीत करण्यात आलेली होती.
सदर बैठकीकरीता विलास यामावर उपविभागीय पोलीस अधिकारी , निवासी नायब तहसिलदार विकास पवार, उप कार्यकारी अभियंता महावितरण आडम, तसेच . शंकर कवितकर गटविकास अधिकारी, पंचायत समिती अक्कलकोट, शैलेश बिराजदार ओएस नगरपालिका अक्कलकोट, अविनाश मडीखांबे, अमर शिरसाठ, इरफान दावण्णा, संजय देशमुख, वसंत देडे, तम्मा शेळके, सुनील बंडगर, प्रा. कलशेट्टी , पत्रकार शिवानंद फुलारी यांनी मनोगत व्यक्त करून सूचना केल्या. तसेच सदर मीटिंगकरिता मिलन कल्याणशेट्टी, बाबासाहेब निंबाळकर, प्रवीण घाडगे, सद्दाम शेरेकर, ऋतुराज राठोड, आलम कोरबु, नन्नू कोरबू, दत्तात्रय माडकर, शुकुर शेख, हुसेन बळोरगी, रफिक पठाण तसेच पोलीस पाटील व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.विलास यामावर यांनी मंडळाचे पदाधिकारी तसेच ईद-ए-मिलाद समितीचे मुस्लिम प्रमुख पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले, श्री गणेश उत्सव शांततेत आनंदी वातावरणात पार पडणे बाबत आवाहन केले आहे. आक्षेपार्ह व धार्मिक तेढ निर्माण करणारे गाणे लावण्यात येऊ नयेत. सामाजिक उपक्रम राबविले जावेत.श्री गणेश प्रतिष्ठापना ठिकाणी 24 तास स्वयंसेवक नेमावेत.सर्वांनी ऑनलाइन अर्ज करून रितसर परवानगी घेऊनच मिरवणूक काढण्यात यावी. मिरवणुकी दरम्यान पारंपरिक वाद्य लावण्यात यावीत, डीजे/डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, मिरवणुकी पूर्वीच मिरवणुकीतील वाहने सुस्थितीत असलेल्या बाबत खात्री करावी, प्रत्येक गणेश उत्सव मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत इ. सुचना देण्यात आल्या, तसेच सदरचे दोन्ही उत्सव शांततेत पार पाडण्याबाबतचे आवाहन करण्यात आले.
सदर बैठकिकरीता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीतील 200 ते 250 पदाधिकारी उपस्थित होते.
