Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पाथरी तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान शेत पिकांचे पशुधन व मालमत्तेचे नुकसान

Admin by Admin
September 2, 2024
in महाराष्ट्र
0
पाथरी तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान शेत पिकांचे पशुधन व मालमत्तेचे नुकसान

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाथरी / परभणी (:- अहमद अन्सारी ) तालुक्यात शनिवारी रात्री रविवारी दिवसभर व रात्रभर झालेल्या तुफान पावसाने पाथरी तालुक्यात पाणीच पाणी झाले आहे.
ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसाने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ,कापूस सोयाबीन उसासारखे पिके पूर्णपणे जमिनीवर झोपले आहे नदी व नाल्याकाठी असलेल्या जमिनी खरडून गेल्याने जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे
तालुक्यातील बोरगव्हाण येथील शेतकरी भगवान नारायणराव खुडे गट क्रमांक 173 यांच्या शेत आखाड्यावर असलेल्या ८० शेळ्यापैकी १० शेळ्या मृत झाल्या व 70 शेळ्या व चारशे कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असुन गाईचे वासरू ,व शेड ,आखाड्यावरील शेती उपयोगी साहित्य वाहून गेल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे ,हादगाव मंडळातील रेनाखळी ,देवेगाव येथे सर्वाधिक पाऊस झाल्याने तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाथरी शहरातील मुर्तुजा कॉलनी ,लेंडी , बाबा कॉलनी, जोडकुवा, कुरेशी मोहल्ला या नाल्याकाठील घरात नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे.
पाथरी तालुक्याचे तहसीलदार शंकर हांदेश्वर यांनी सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे .
चौकट.. –
पाथरी तालुक्यात जून पासून झालेल्या मोजक्या पावसाने आतापर्यंत पिके जोमदार होती परंतु या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या नुसत्या पिकावरच नाही तर त्यांच्या स्वप्नावर सुद्धा नांगर फिरवलाय त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी अडचणीत येणार आहे , शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची करावे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.पाथरी तालुक्यात तालुक्यात झालेल्या धुवांधार पावसाने नदी नाले तुडुंब भरले असून तालुक्यातील मंजरथ , ढालेगाव, तारूगव्हाण मुदगल बंधारा 100% भरले असून त्यांचे संपूर्ण दरवाजे उघडले आहे व त्यातून विसर्ग गोदापात्रात सुरू आहे अशी माहिती पाथरी तहसीलदार यांनी दिली .

 

Previous Post

अखेर ..प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भास्कर भिलवंडे यांना न्याय दिला

Next Post

अक्कलकोट बसस्थानक परिसरात प्रवाशाचें हाल ,  लहुजी शक्ती सेनेचे हालगीनाद आंदोलन

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट बसस्थानक परिसरात प्रवाशाचें हाल ,  लहुजी शक्ती सेनेचे हालगीनाद आंदोलन

अक्कलकोट बसस्थानक परिसरात प्रवाशाचें हाल ,  लहुजी शक्ती सेनेचे हालगीनाद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697