Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अखेर ..प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भास्कर भिलवंडे यांना न्याय दिला

Admin by Admin
September 2, 2024
in राजकीय
0
अखेर ..प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भास्कर भिलवंडे यांना न्याय दिला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शरदचंद्रजी पवार गटाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड
नायगाव ( :- सय्यद अजिम नरसीकर )
गेल्या पंधरा वर्षांपासून पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रस्थापित आले आणि निघून गेले मात्र नायगाव मतदारसंघात संयम अन् संघर्ष करणारे राष्ट्रवादीचे शिलेदार भास्कर भगवानराव पा. भिलवंडे ह्या व्यक्तिमत्त्वांनी कधीही पक्षाचा झेंडा खांद्यावरून खाली उतरू न दिल्याने त्या एकनिष्ठ कार्याची दखल घेत अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची शरदचंद्रजी पवार गटाच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष पदावर निवड करून न्याय मिळवून दिला.
नायगाव तालुक्यातील भूमिपुत्र भास्कर भगवानराव पा. भिलवंडे हे गेल्या अनेक दिवसापासून राजकीय क्षेत्र असो अथवा सामाजिक क्षेत्र असो भास्कर भिलवंडे यांनी कधीही आपल्या चारित्रावर डाग लावू दिला नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक प्रस्थापित लोकप्रतिनिधी आले आणि पदाभोगून निघून गेले अशी परिस्थिती राष्ट्रवादी संघटना वाढविण्यासाठी अहोरात्र भिलवंडे काम करत असतांना पक्षाचे जेष्ट नेते व भास्कर भिलवंडे यांचे गुरुवर्य दिवंगत बापूसाहेब गोरठेकरांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी नायगाव मतदारसंघ सोडून भोकर मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन गेले होते.तेव्हा ही भास्कर भिलवंडे यांनी राष्ट्रवादी पक्षात राहून वेळोवेळी पक्षाला न्याय मिळवून दिला होता.
त्या अनुषंगाने भास्कर पाटलांची आगामी निवडणूकीच्या तोंडावर त्यांच्यावर जिल्ह्याची जवाबदारी देऊन ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड प्रांत अध्यक्ष यांनी केली होती. मात्र पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणात हरिहरराव भोसीकरांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अजितदादा गटासोबत घरोबा केल्याने जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले होते.
त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी एक नव्हेतर तीन पक्ष निरीक्षक नेमणूक करून जिल्हाध्यक्ष पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या.तर होऊ घातलेल्या बैठकीत प्रामुख्याने भास्कर भिलवंडे यांचे नाव आघाडीवर होते,तर अंतिम टप्प्यात आ. राजेश टोपे यांच्यासमोर देखील भिलवंडे यांचे नाव पुढे आल्याने एक नव्हे तर दोन जिल्हाध्यक्ष करणार असे संकेत पक्ष निरीक्षक आ. राजेश भैय्या टोपे यांनी दिले होते.मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक वरिष्ट नेत्याच्या आदेशानुसार जिल्ह्यात एकच जिल्हाध्यक्ष म्हणून भगवानराव आलेगांवकरांची निवड करण्यात आले.
तेव्हा कुठल्याही मनात नाराजगी न बाळगता भास्कर भिलवंडे पक्षाचे काम त्याचं जोमाने सुरू ठेवल्यामुळे शुक्रवारी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तुतारी गटाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी भास्कर भिलवंडे निवड करून नियुक्ती पत्र दिले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूबभाई,नांदेडचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, देगलूरचे युवा नेते तथा युवकचे नांदेड कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार,नायगावचे युवक तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर,तालुका सचिव श्याम पाटील चौंडे, माधव कोरे यांची उपस्थिती होती
चौकट –
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भिलवंडे यांना सलक दुसऱ्यांदा पक्षात न्याय दिला
नायगाव तालुक्यातील भूमिपुत्र भास्कर भगवानराव पाटील भिलवंडे यांच्यावर पक्षांतर्गत कुरघोडी करत बिनबुडाचे आरोप केले होते, त्या निर्णयाच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दाद भिलवंडे यांनी माघीतली होती.त्या अनुषंगाने तीन वेळा पक्ष निरीक्षक यांना पाठवून आढावा घेत किल्नचिठ देत जिल्हा उपाध्यक्ष त्यानंतर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदावर प्रांत अध्यक्ष यांनी सलग दुसऱ्यांदा निवड करून मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात नियुक्ती पत्र प्रदान देण्यात आल्याने भास्कर भिलवंडे यांनी आभार व्यक्त केले.

Previous Post

नितेश राणे यांना अटक करा मुस्लिम समाजातर्फे मागणी

Next Post

पाथरी तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान शेत पिकांचे पशुधन व मालमत्तेचे नुकसान

Admin

Admin

Next Post
पाथरी तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान शेत पिकांचे पशुधन व मालमत्तेचे नुकसान

पाथरी तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान शेत पिकांचे पशुधन व मालमत्तेचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697