सामाजिक

करमाळा तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम

 

करमाळा ( आयुब शेख )करमाळा तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली, गेल्या दोन महिन्यापासून वृक्ष लागवडीचे नियोजन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी प्रयत्न करून करमाळा पोलीस स्टेशनच्या आवारात आणि इतर सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करून त्या झाडाचे जतन करण्यासाठी चारही बाजूंनी संरक्षण जाळी बांधून वृक्ष लागवड केलेली आहे. करमाळा शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, डी वाय एस पी अजित पाटील पोलीस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी मनोज राऊत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच सर्व शाळेतील विद्यार्थिनी विद्यार्थी व सर्व पोलीस बांधव पोलीस पाटील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण व उद्घाटन करण्यात आले तसेच वृक्ष केलेल्या झाडांचे पाहणी केली त्यानंतर पंचायत समिती हॉल येथे सांगता कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमादरम्यान गेल्या दोन महिन्यापासून पोलीस हवालदार अजर शेख आणि हावलदार बालाजी घोरपडे यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते हवालदार अजर शेख आणि हावलदार बालाजी घोरपडे यांचा आदर्श पोलीस म्हणून वृक्ष देऊन सत्कार सन्मान करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये अतुल कुलकर्णी बोलताना म्हणाले मुलांनो तुमच्या प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावून ते झाड जतन करा आणि लावलेले झाड फळाचे असले पाहिजे ते तुम्हाला नक्कीच एक आठवण म्हणून फळ देईल त्याचे उत्पन्न वाढेल असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले या कार्यक्रमासाठी उपस्थितीत पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष संदीप पाटील व सर्व पोलीस पाटील स्टाॅप यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी व इतर शाळेतील आलेले विद्यार्थी विद्यार्थीनी शिक्षक उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button