Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा शेकाप ने आक्रमकपणे लढला.. भाई मोहन गुंड

Admin by Admin
August 16, 2024
in सामाजिक
0
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा शेकाप ने आक्रमकपणे लढला.. भाई मोहन गुंड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शेतकरी कामगार पक्षाचे तालुका अधिवेशन संपन्न.. विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी..

माजलगाव ( नाजेर कुरेशी ) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या सह डाव्या विचाराच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या तळागाळातील शेतकरी, कष्टकऱ्यांना सोबत घेऊन आक्रमकपणे लढला त्यामुळेच मुंबई महाराष्ट्राची होऊ शकली असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहन गुंड यांनी माजलगाव तालुक्यातील शुक्ल तीर्थ लिमगाव येथे शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात केले.. महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा* *क्रांतिकारी असून छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, क्रांतिसिंह नाना पाटील या क्रांतिकारक महापुरुषांनी महाराष्ट्राला पुरोगामीत्वाची देण दिलेले असून या महापुरुषांचा वारसा शेतकरी कामगार पक्ष कायम जपत आलेला असून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचाराला केंद्रस्थानी ठेवून शेतकरी कामगार पक्ष लढत आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शेतकरी कामगार पक्षासह डाव्या विचाराच्या लोकांनी अग्रभागी राहून अखंड महाराष्ट्राला जागृत करून मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला त्यातूनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. महाराष्ट्राचा राजकारणात शेतकरी कामगार पक्षाने एक वेगळा आदर्श निर्माण केला असून रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकारशाही ही शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्राला दिलेली देण आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाने कधीही तडजोड केली नाही, श्रमिकांशी बांधिलकी जपत शेतकरी कामगार पक्ष कायम रस्त्यावर मोर्चे आंदोलने व लढे लढत आला आहे.
आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचा आकडा हजारोने वाढत असताना राज्यकर्ते भ्रष्टाचार करण्यात व केवळ सत्तेचा वापर स्वार्थासाठी करण्यात मश्गुल आहेत. महाराष्ट्राला आज शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराची गरज असून शेतकरी कामगार पक्षच महाराष्ट्राचे हित जोपासू शकतो असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या माजलगाव तालुका अधिवेशनात शुक्लतीर्थ लिमगाव येथे केले*. *यावेळी भाई मुंजा पांचाळ यांची माजलगाव तालुका चिटणीस पदी एक मताने निवड करण्यात आली तर सहचिटणीस पदी भाई राहुल सोळंके,* *भाई सतीश शेजुळ, खजिनदारपदी भाई विष्णू शेळके चिटणीस मंडळ सदस्य पदी श्रीराम शेवाळे व सदस्य पदी भाई सुभाष थोरात, भाई मनोहर माने, भाई लक्ष्मण बादाडे, भाई प्रकाश नायबळ, भाई अभिजीत आठवे, भाई गोविंद आढाव, भाई बाबुराव शेळके यांची निवड करण्यात आली तर शेतकरी सभेच्या तालुका अध्यक्षपदी भाई सुदाम चव्हाण तर चिटणीसपदी भाई माऊली चंदनशिव, सहचिटणीस भाई साळुजी हांडे, खजिनदार चांगदेव शेजुळ चिटणीस मंडळ सदस्य जनार्दन कुदळे, यांची तर पुरोगामी युवक संघटनेच्या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी भाई अशोक बाप्पा कुलकर्णी व तालुका चिटणीसपदी अनंत चव्हाण, तालुका सहचिटणीस पदी भाई गणेश सोनटक्के, खजिनदार भाई किशोर पांचाळ यांची निवड करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर अधिवेशनाच्या अध्यक्षपदी भाई लक्ष्मण आप्पा चव्हाण, रामभाऊ शेंडगे, भाई ॲड नारायण गोले पाटील यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाई भास्कर कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन भाई माऊली चंदनशिव यांनी केले यावेळी भाई सुभाष शेरकर, भाई मुकेश शेरकर,रामभाऊ शिंदे, पाराजी हांडे, भाई नामदेव शेरकर, भाई सचिन पांचाळ, नवनाथ कांबळे, बाई माऊली गर्दी यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कार्यकर्त्यांसह शेकडो गावकरी उपस्थित होते.

शेकापच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी -भाई मुंजा पांचाळ यांची माजलगाव तालुका चिटणीस पदी एक मताने निवड करण्यात आली तर सहचिटणीस पदी भाई राहुल सोळंके, भाई सतीश शेजुळ, खजिनदारपदी भाई विष्णू शेळके चिटणीस मंडळ सदस्य पदी श्रीराम शेवाळे.
शेतकरी सभेच्या तालुका अध्यक्षपदी भाई सुदाम चव्हाण तर चिटणीसपदी भाई माऊली चंदनशिव* *सहचिटणीस भाई साळुजी हांडे, खजिनदार चांगदेव शेजुळ चिटणीस मंडळ सदस्य जनार्दन कुदळे, यांची तर पुरोगामी युवक संघटनेच्या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी भाई अशोक बप्पा कुलकर्णी व तालुका चिटणीसपदी अनंत चव्हाण, तालुका सहचिटणीस पदी भाई गणेश सोनटक्के, खजिनदार भाई किशोर पांचाळ यांच्या निवडी अधिवेशनात एक मताने करण्यात आल्या.

Oplus_131072
Previous Post

सोलापूर ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची अन्नछत्र मंडळास भेट

Next Post

हजरत शेख नुरुद्दीन चिस्ती साहेबांच्या ऊर्स शरीफला २१ ऑगस्टपासून  प्रारंभ

Admin

Admin

Next Post
हजरत शेख नुरुद्दीन चिस्ती साहेबांच्या ऊर्स शरीफला २१ ऑगस्टपासून  प्रारंभ

हजरत शेख नुरुद्दीन चिस्ती साहेबांच्या ऊर्स शरीफला २१ ऑगस्टपासून  प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157236
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697