सोलापूर

सोलापूर येथे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे तीव्र निदर्शने     

                                सोलापूर ( रमेश सुरवसे ) :- राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्या आदेशानुसार ” जुनी पेन्शन योजना लागू करावी. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांच्या/ शासकीय निमशासकीय शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्याकरिता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा सोलापूर, यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुचविल्यानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयासमोर तसेच मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर रासकम.संघटनेचे सोलापूर जिल्हा लढाऊ नेते राजाभाऊ सोनकांबळे यांच्या कुशल आणि संघटित मार्गदर्शनाखाली तसेच ज्येष्ठ नेते भीमराव लोखंडे आणि रघुनाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपात निदर्शने करण्यात आली.या निदर्शनाच्या वेळी रासकम. संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख नेते विजय भांगे सर तसेच तडफदार युवा नेतृत्व शशिकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक जननी म्हणून गणली जाणारी ” जिल्हा कोषागार कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत सोलापूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर रोड सोलापूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तालुका मंद्रूप जिल्हा सोलापूर, तसेच तालुका निहाय संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर,  तालुका रुग्णालय, तालुका अक्कलकोट, भूमी अभिलेख कार्यालय सोलापूर शहर, अशा अनेक खातेनिहाय विभाग प्रमुखांच्या संघटनांनी आपल्या नेतृत्वाखाली त्यांच्या त्यांच्या कार्यालयासमोर, गेट समोर तीव्र स्वरूपात निदर्शने केली आहेत.या निदर्शनाच्या वेळी महिला कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये आज दि.09 ऑगस्ट  रोजी दुपारी 01 ते 02 या भोजनवेळी जिल्हा कोषागार कार्यालय , सोलापूर येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन तीव्र निदर्शने केली.या निदर्शनामध्ये ज्येष्ठ नेते रघुनाथ बनसोडे आणि भीमराव लोखंडे तसेच विजयकुमार भांगे, राजाभाऊ सोनकांबळे व शशिकांत भालेराव यांच्यासह जिल्हा कोषागार कार्यालया मधील प्रमुख पदाधिकारी तसेच महिला कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button