सामाजिक

सामाजिक जान आणि भान असलेल्या रेखा बनसोडे नी केला पत्रकार सय्यद अजिम हाजी हुसेनसाब नरसीकर यांचा सन्मान

नायगाव (प्रतिनीधी ):-
तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेखा बनसोडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून तळागाळातील लोकांसाठी भरीव काम केल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची विविध वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाले आहेत,पत्रकार बांधवच आपणास मोठे केले ही उदात भावना मनाशी ठेवून त्यांच्या कामाई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ व ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून अनेक पत्रकाराचा त्यांनी सन्मान चिन्ह शाल पुष्पहार देऊन सन्मान केलेला आहे.
नायगाव शहरातील माधव पाटील चव्हाण यांच्या फायनान्स कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या पत्रकाराचा सन्मान व हळदी कुंकू कार्यक्रमात अध्यक्षस्थानी कामाई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई बनसोडे यासह सुनिता गंगाधरराव कोकणे,जनता हायस्कूल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव अंचोंलीकर सामाजिक कार्यकर्त्या महानंदा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती,प्रारंभी राजमाता जिजाऊ, ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व उपस्थित पत्रकारांचा सन्मान चिन्ह शाल पुष्पहारने सन्मान करण्यात आला तर मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण यांच्या वतीने ही पत्रकाराचा डायरी पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आहे उपस्थित मान्यवरांनी आपले यावेळी विचार मांडले सदर संस्थेच्या वतीने महिलांचा मकर संक्रातीच्या सणामुळे हळदीकुंकू लावून वान देण्यात आले. यावेळी अशोक कुंभार, वसंत पांचाळ, शोभाबाई पवार, ललिताबाई पवार, मीराबाई पवार,अर्चना पवार,मुद्रकबाई पवार, शकुंतलाबाई पवार, लक्ष्मीबाई कांबळे, पिराबाई भेदेकर,चौत्राबाई भालेराव, विमल भालेराव, लक्ष्मीबाई कुंभार, भागनबाई कुंभार,दीक्षा गायकवाड यासह अनेक महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार माधव बैलकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button