टॉप न्यूज

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक धानय्या कौटगीमठ यांचे  महाराष्ट्र सेट परीक्षेत 66 विद्यार्थी उत्तीर्ण !

अक्कलकोट ( प्रतिनिधी ): येथील शिक्षक धानय्य कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सेट परीक्षेत तब्बल ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
 महाराष्ट्र गोवा राज्यातील  प्राध्यापक पात्रता परीक्षा   परीक्षा ७ एप्रिल २०२४ रोजी  सावित्रीबाई फुले    विध्यापीठ पुणे  यांनी विद्यपीठ अनुदान आयोग यु जी सी नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता. १०९२५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.या परीक्षेचा निकाल ५ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात आलाआहे.   ७२७३ विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत .उत्तीर्ण प्रमाण ६.६६% आहे.
धानय्य कौटगीमठ यांनी स्वतः ७७ वेळा सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण  होऊन ,स्वतः ला मिळालेल्या ज्ञाना चा ,अनुभवांचा इतर विद्यार्थीना व्हावे या उद्देशाने यु ट्यूब मार्फत मोफत मार्गदर्शन करीत आहेत.या वेळी विक्रमी ६६ विद्यार्थी  महाराष्ट्र, गोवा ,कर्नाटक राज्यतील विद्यार्थी एम एच सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.६६ पैकी ४१ पुरुष आणि २५ महिला विद्यार्थ्यांनी आहेत.इंग्रजी ३३ , कॉमर्स ६, पोलिटिकल सायन्स ४,  फिजिक्स४, हिस्टरी ३, मराठी २,इकॉनॉमिक्स २, एजुकेशन २,  लायब्ररी सायन्स २, माथेमॅटिक्स २ ,हिंदी १,लाईफ सायन्स१,सोसिओलाजी १,केमिस्ट्री१, अर्थ सायन्स१, इलेक्ट्रॉनिक १ असे एकूण ६६ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड चे कैलास राठोड हा अनाथ विद्यार्थी आहेत.महिला , विधवा ,गरीब ,दिव्यांग ,तसेच जिल्हा परिषद शिक्षक, वकील ,पोलीस अधिकारी सुद्धा सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. कोल्हापूर चे प्रा योगेश चौगुले यांनी १२ व्या प्रयत्न मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत गोवाची १ आणि कर्नाटक ची २ विद्यार्थी  पास झाले आहेत.  नुकताच  कर्नाटक सेट परीक्षेत सुद्धा २११ विद्यार्थी घव घवीत यश संपादन केले आहेत. आता पर्यंत धानय्य कौटगी मठ सरांच्या यु ट्यूब मोफत मार्गदर्शन घेऊन ७६८  विद्यार्थी सेट नेट टी ई टी आणि पेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button