टॉप न्यूज

बुधवारी सोलापुरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

 

सोलापूर ( प्रतिनिधी )मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाखो लोक एकत्रित जमा होऊन शांतता रॅली काढून सभा घेणार आहेत. या दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा ,कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच सात ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री दहा वाजेपर्यंत मराठा आरक्षण शांतता रॅली संबंधाने छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना जाण्यास येण्यास बंद करण्यात आलेला आहे. तसेच सात ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री दहा वाजेपर्यंत मराठा आरक्षण शांतता रॅली संबंधाने छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना जाण्यास येण्यास बंद करण्यात आलेला आहे. शांतता रॅलीस जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होणारा असून यामुळे लोकांची होणारी गर्दी शहरातील विविध शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा आश्रम शाळा, महाविद्यालय व व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या शैक्षणिक संस्थातील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. शांतता रॅलीस जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होणारा असून यामुळे लोकांची होणारी गर्दी शहरातील विविध शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा आश्रम शाळा, महाविद्यालय व व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या शैक्षणिक संस्थातील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.

Oplus_131072

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button