सकल मुस्लीम समाज करमाळा यांचा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जनजागरण व शांतता रॅलीस जाहीर पाठिंबा
करमाळा ( आयुब शेख ) उद्या दिनांक 07/08/2024 रोजी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक दिवस समाजासाठी आपल्या मुला बाळांच्या भविष्यासाठी . मराठ्यांचं भगवे वादळ घेऊन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब सोलापूर येथे मराठा आरक्षण जनजागरण व शांतता रॅलीसाठी येत आहेत या करिता लाखोच्या संख्येने उपस्थित रहा. आणि या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी सकल मुस्लीम समाज करमाळा हे सुद्धा आपल्या मोठ्या भावाच्या खांद्याला खांदा लावून या जनजागरण व शांतता रॅली करिता उपस्थित राहणार असून मुस्लीम बांधव सुद्धा या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल मुस्लीम समाज करमाळा चे शहर अध्यक्ष जमीर भाई सय्यद व आझाद भाई शेख यांनी आवाहन केले आहे यावेळी सकल मुस्लीम समाजाच्या बैठकीत सुरज भाई शेख, रमजान भाई बेग, दिशान भाई कबीर,आलिम भाई खान,अफजल कुरेशी.खलील कुरैशी अरबाज बेग . इकबाल भाई शेख,शाहीद भाई बेग,कलीम भाई शेख,कय्युम मदारी. इरफान सय्यद. आदी उपस्थित होते.
संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीस सोलापूर येथे जाण्यासाठी सकाळी ठीक 6 : 30 वाजता छत्रपती चौक करमाळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी सर्व बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.



