सोलापूर

सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयात ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न

सोलापूर ( प्रतिनिधी )

सोलापूर येथील भरोसा सेल शहर पोलीस आयुक्त कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त एम राजकुमार होते. यावेळी पोलीस उपायुक्त दिपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वेगवेगळ्या कायद्यांची माहिती दिली. तसेच मदत कशी मिळवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त दिपाली काळे आपुलकी बेघर निवारा केंद्र सोलापूर व्यवस्थापक अशोक गायकवाड यशसिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष शिवपुत्र घटकाबंळे आदींनी मार्गदर्शन केले. भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक एस एस चाटे यांनी शेवटी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे यांनी केले. या कार्यक्रमास माजी सैनिक मारुती मोरे नबीलाल शेख लिंबाजी कांबळे प्रकाश घटकांबळे सूर्यकांत गजघाटे प्रमोद जाधव अरुण डावरे दिलावर शेख गणपत ऐवाळे आदींसह ज्येष्ठ नागरिक पोलीस कर्मचारी पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button