सामाजिक
पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचा सत्कार

अक्कलकोट (प्रतिनिधी ) अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ मे रोजी शिवसेना नेते सुनील कटारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांना मानाची टोपी , पुष्पहार ,पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी पो. नि. महेश स्वामी यांना वाढदिवसानिमित्त सुनील कटारे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी सैनिक श्रीकांत मोरे , पत्रकार नंदकुमार जगदाळे , स्वामीराव गायकवाड, राजेश जगताप ,सामाजिक कार्यकर्ते पंकज मडीखांबे , पोलीस कर्मचारी माने आदींसह पोलीस कर्मचारी , विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.