टॉप न्यूज

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सोनू सूद यांनी केले झी कन्नड सारेगमप लिट्ल चॅम्प दिव्यांग बाल गायक रेवणसिध्द फुलारीचे कौतुक.

 लवकरच आगामी चित्रपटात देणार प्लेबॅक सिंगिंग साठी संधी
अक्कलकोट :- ( प्रतिनिधी )
सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर येथील दिव्यांग बाल गायक झी कन्नड सारेगमप लिट्ल चॅम्प सीजन 19 चे फायनालिस्ट रेवणसिध्द फुलारी यांचे गायनाचे प्रशंसा करून लवकरच हिंदी सिनेसृष्टीत प्लेबॅक सिंगींग साठी संधी देणार असल्याचे आश्वासन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सोनू सूद यांनी दिले.
 30 जुलै रोजी मुंबई येथील वर्सोवा शक्तीसागर फिल्म प्रोडक्शन ऑफिस अंधेरी वेस्ट मुंबई परिसरात  ख्यातनाम अभिनेते रियल हिरो सोनू सूद यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार विफुल मिरजकर यांच्या सोनू सूद च्यारिटी क्लबचा सहकार्याने भेटघेवून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या समोर त्यांच्याच चित्रपटातील गाणी  आणि कन्नड भाषेतील वाढदिवसाचे शुभेच्छा गीत गायन करून रेवणसिद्ध फुलारी वाढदिवसाचे शुभेच्छा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या वेळी खुद्द सोनू सूद यांनी या बाल दिव्यांग गायकला आगामी हिंदी चित्रपटात प्लेबॅक सींगिंग साठी संधी देणार असल्याचे सांगितले.एक महान कलाकाराला भेटल्याचे आणि त्यांच्या समोर गाणे गायल्याचे आनंद चिरस्मरणात राहणार आहे.
 रेवणसिद्ध फुलारी या पूर्वी ही कर्नाटक राज्यात पार पडलेल्या झी कन्नड सारेगमप लिट्ल चॅम्प सीजन 19 मध्ये उत्कृष्ठ परफॉर्मन्स देऊन संगीत क्षेत्रातील दिग्गज लोकांकडून वाहवा मिळवलं आहे . तसेच कन्नड फिल्म इंडस्ट्री मधील दिग्गज कलाकारांच्या चित्रपट प्रिरीलिज इव्हेंट मध्ये सहभागी होऊन दिग्गज कलाकार स्टार सिंगर के.एस चित्रा ,मंगली मॅडम,डॉ. हंसलेखा ,विजय प्रकाश ,अर्जुन जन्या ,राजेश कृष्णन , मनोहर , नागेंद्र प्रसाद, व्ही. हरिकृष्णा  तसेच उदयोन्मुख गायक गायिका यांच्या कडून शाबासकीची थाप मिळवलं आहे .आता येणाऱ्या दिवसात रेवणसिद्ध फुलारी इंडीयन आयडल सारख्या नॅशनल लेव्हलच्या स्पर्धेत सहभागी होऊन सोलापूर जिल्हा आणि अक्कलकोट तालुक्याचे नांव गाजविणार आहे.
या वेळी विफुल मिरजकर, शरणप्पा फुलारी,रोहित फुलारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button