महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू

बारामती : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, डीजीसीएकडून (DGCA) या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
नेमकी घटना काय? -आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये झंझावाती सभा घेणार होते. यासाठी ते आज सकाळी मुंबईहून खाजगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. बारामती विमानतळावर उतरत असतानाच विमानावरचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच विमान जवळच्या शेतात कोसळून त्याला भीषण आग लागली.या अपघातात ६ जणांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे दोन वैयक्तिक सहाय्यक, वैमानिक आणि अन्य दोन व्यक्तीचे समावेश होते. यावेळी विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून बचावकार्य तातडीने राबवण्यात आले.



