धार्मिक
अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील हजरत ख्वाजा सैफुल मुलुक चिस्ती दर्गाहच्या ८९३ व्या ऊर्स (यात्रा) दि.५ नोव्हेंबर पासून प्रारंभ

अक्कलकोट ( प्रतिनिधी: )अक्कलकोट तालुक्यातील प्रसिद्ध सूफी संत हजरत ख्वाजा हाजी सैफुलमुल्क चिश्ती कादरी रह. यांचा ८९३ वा उर्स-ए-शरीफ हैद्रा येथे मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. यानिमित्त दि. ५,६ व ७ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दरगाह ट्रस्ट कमिटीचे चेअरमन रफीक मुजावर यांनी दिली.
तीन दिवसीय कार्यक्रम पुढील प्रमाणे –
दि. ५ नोव्हेंबर २०२६ वार गुरुवार – संदल शरीफ(गंध) पहाटे फजरच्या नमाजानंतर संदलची रवानगी (गंध मिरवणुक) होणार आहे. कर्नाटकातील मु.पो. करजगी येथील पाटील यांच्या घरापासून संदल मिरवणुकीस सुरुवात होईल.
दि. ६ नोव्हेंबर २०२६ वार शुक्रवार – चिरागां (दीपोत्सव) व रात्री ९:००वाजता प्रसिद्ध कव्वालांचा मुकाबला होणार आहे.यामध्ये मुंबईचे प्रसिद्ध अजिम नाझा कव्वाल सूफी सिंगर ग्रुप आणि राजस्थानचे नुसरत कादरी कव्वाल सूफी सिंगर ग्रुप आपली कला सादर करणार आहेत.
दि.७ नोव्हेंबर २०२६, वार शनिवार – जियारत व प्रसाद वाटप: पहाटे जियारत व प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
हजरत ख्वाजा सैफुल मुलुक चिस्ती दर्गाहच्या ऊर्स (यात्रे)निमित्त जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गा ट्रस्टच्या वतीने चेअरमन रफीक मुजावर व सर्व ट्रस्ट सदस्य यांच्यावतीने करण्यात आले आहे.
चौकट -हजरत ख्वाजा सैफुल मुलुख चिस्ती दर्गा येथे येणाऱ्या भाविकांची लूट होणार नाही याची दक्षता ट्रस्टच्या वतीने घेण्यात आली असून नैवेद्यासाठी पाचशे रुपये घेण्यात येणार आहेत. जर कोणी भाविक भक्तांना आर्थिक लुबाडणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन रफिक मुजावर यांनी दिली. तसेच दर्गा येथे येणाऱ्या भाविकांसाठी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत नाश्त्याची सोय रात्री सात ते दहा वाजेपर्यंत प्रसादाची सोय करण्यात आल्याची माहिती रफिक मुजावर यांनी दिली.



