क्रिडा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा मुले व मुली कबड्डी संघ विभागीय स्पर्धेमध्ये उपविजेता

 

करमाळा ( आयुब शेख ) – येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये मुले व मुलींचा संघ उपविजेयी ठरलेला आहे. महाराष्ट्र शासन क्रीडा युवक व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोलापूर विभागस्तरीय कबड्डी स्पर्धा (सर्व वयोगट मूले व मुली) या सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर शहर, अहिल्यानगर ग्रामीण, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पिंपरी चिंचवड, क्रीडा प्रबोधिनी, मिशन लक्षवेध अशा वेगवेगळ्या भागातून स्पर्धेमध्ये कबड्डी संघ सहभागी झाले होते. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा कबड्डी संघ हा सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत विभागीय स्पर्धांमध्ये सोलापूर शहर संघाचा पराभव करत उपांत्य पूर्व फेरी गाठली. उपांत्य फेरीमध्ये अहमदनगर जिल्हा संघाला हरवत अंतिम फेरीमधे दाखल झाला व स्पर्धेमध्ये पुणे शहर संघाविरुद्ध खेळी करत उपविजयी झाला. या संघाला महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख प्रा.रामकुमार काळे व कबड्डी कोच श्री.नवनाथ माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या विजयी खेळाडूंना विद्या विकास मंडळाचे सचिव .विलासरावजी घुमरे , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.ए.पी. माने, उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, प्रशासन अधिकारी श्री.संभाजी किर्दाक,कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button