सांस्कृतिक
विवेकानंद प्रतिष्ठानच्यावतीने २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ सहा दिवसीय गणेशोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ):
स्व. पंचप्पा कल्याणशेट्टी सर यांच्या प्रेरणेने व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद प्रतिष्ठानच्यावतीने २९ सप्टेंबर २०२६ ते ४ ऑक्टोबर २०२६ असे सहा दिवसीय गणेशोत्सव व्याख्यानमाला आयोजित केली असल्याची माहिती मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस विवेकानंद प्रतिष्ठानचे अशोक येनगुरे, मल्लिकार्जुन मसुती, मनोज कल्याणशेट्टी, संतोष जीरोळे, गुरुपादप्पा आळगी, चंद्रकांत दसले आदीजण उपस्थित होते.
मंगळवार २९ सप्टेंबर २०२६ रोजी तुफान विनोदी नाटक शिक्कामोर्तब, बुधवार ३० रोजी प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशपायन यांचे “मर्मबंधातली ठेव” भावगीते, भक्ती गीते व चित्रपट इथे सादर करणार आहेत. १ आक्टोंबर २०२६ रोजी सुप्रसिद्ध कवित्री गुंजन पाटील यांचा “जाऊ कवितांच्या गावा”, २ ऑक्टोंबर रोजी पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे “मेळघाटातील आरोग्यदूत” यांच्याशी माधव देशपांडे संवाद साधणार आहेत. ३ ऑक्टोंबर रोजी अमृत वक्ता स्वानंद बेदरकर हे “वंद्य वंदे मातरम” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ४ ऑक्टोंबर रोजी “…म्हणून स्वातंत्र्यवीर” सांघिक अभिवाचन कार्यक्रम प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन, ए वन चौक अक्कलकोट येथे रोज सायंकाळी ६. ३० वाजता संपन्न होणार आहेत.विवेकानंद प्रतिष्ठानच्या गणेश उत्सव व्याख्यानमालेचा लाभ अक्कलकोट शहर व तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन विवेकानंद प्रतिष्ठानचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी तसेच अशोक येणगुरे यांनी केले. शेवटी आभार मल्लिकार्जून मसुती यांनी मानले.



