सामाजिक
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या तालुका उपाध्यक्षपदी सुनिल पाटील यांची नियुक्ती

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या अक्कलकोट तालुका उपाध्यक्षपदी सुनिल सूर्यकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड जाहीर केली.
सुनिल पाटील हे तालुक्यातील सलगर येथील रहिवासी असून, सामाजिक कार्याची आवड आणि माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही नियुक्ती ५ नोव्हेंबर २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे.
माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करणे, सामान्य नागरिकांमध्ये या कायद्याविषयी जागृती निर्माण करणे, कायद्याचा प्रसार व प्रचार करणे तसेच भारतीय संविधान, भारतीय कायदे आणि महासंघाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करून पदाची जबाबदारी पार पाडणे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे अक्कलकोट तालुक्यात माहिती अधिकार चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. सुनिल पाटील यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.






