क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

 

सोलापूर – : गणेशोत्सव मंडळाच्या पाचशे ड्रेसचे प्रत्येकी सहाशे रुपये प्रमाणे टेलरला देण्यासाठी तब्बल तीन लाख रुपये मागणी केली, त्याला नकार दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी निराळे वस्ती येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाचा सदस्य नेताजी शिवाजी शिंदे यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी एकनाथ सोपान घाडगे, वय ६७ वर्ष, व्यवसाय – हॉटेल व्यवसाय, रा. मुरारजी पेठ, सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हॉटेल आहे. दि.१४/०९/२०२६ रोजी सायंकाळी ०७.४५ वा. च्या सुमारास निराळे वस्ती येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाचे सदस्य नेताजी शिवाजी शिंदे याने मडळाचे नावाचे ५०० ड्रेसचे प्रत्येकी ६०० रूपये याप्रमाणे टेलरला देण्यासाठी एकूण ३,००,००० रू मागणी फिर्यादी यांना केली. त्यावर फिर्यादी यांनी त्यांची तीन लाख रूपये देण्याची आर्थीक परिस्थीती नसल्याचे सांगून दरवर्षी प्रमाणे २५,००० रू वर्गणी देतो असे सांगीतले.

तसेच मी यापुर्वी मंडळाला २,००,००० रू दिले आहेत असे सांगून शिंदे याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे याने तीन लाख रूपये देण्याचा आग्रह धरत फिर्यादीच्या अंगावर येऊन शिवीगाळ केली व सदर रककम न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली, त्यामुळे फिर्यादी हे घाबरून चक्कर येऊन पडले होते. सदर बाबत माहीती मिळताच वपोनि महादेव राऊत, फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर शहर यांनी तात्काळ दखल घेऊन फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत.

नागरीक यांना आवाहन करण्यात येते की धार्मिक किंवा सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी

-देण्याबाबत कोणी जबरदस्ती करीत असल्यास, वर्गणी पैशांसाठी धमकावत असल्यास किंवा शिवीगाळ करून त्रास देत असल्यास सदर बाबतची माहीती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी. गणेशोत्सव मंडळांनी नागरिकांकडून स्वेच्छेने दिली जाणारी वर्गणी स्वीकारून उत्सव शांततेत व सलोख्याने साजरा करावा. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा इ सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button