धार्मिक

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दीपोत्सव

अक्कलकोट :(प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या व न्यासाचे  कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. अलकाताई जनमेजयराजे भोसले व अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा सौ. अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी सालाबादप्रमाणे यंदाही महाप्रसादालयाच्या कपिला गायी समोरील प्रांगणात व परिसरात दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी हिरकणी संस्थेच्या महिला सदस्या व स्वामी भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.
त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण असून, हा दिवस असुरांच्या विनाशाचा आणि धर्मविजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान शंकरांनी या दिवशी त्रिपुरासुर नावाच्या महाभयानक असुराचा आणि त्याच्या तिन्ही नगरींचा नाश करून देव आणि मानवजातीला त्याच्या त्रासातून मुक्त केले. या विजयामुळे शंकरांना ‘त्रिपुरारी’ असे नाव पडले आणि देवलोकात ‘देव दिवाळी’ साजरी केली गेली. यामुळे दीपोत्सव साजरा केला जातो. 
दरम्यान अन्नछत्र मंडळाच्या महाप्रसादालयाच्या कपिला गायी समोरील प्रांगणात व परिसरात भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती. या ठिकाणी दीपोत्सव करण्यात आला. या बरोबरच परिसराती श्री तुळजाभवानी माता मंदिरा समोरील दीपमाळा ह्या दीपोत्सवाने उजळून निघाल्या होत्या. 
यावेळी सौ. अलकाताई जनमेजयराजे भोसले व सौ. अर्पिताराजे अमोलराजे भोसले, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, सुवर्णा घाटगे, स्वप्ना माने, रुपा पवार, अनिता गडदे, श्रद्धा मोरे, उज्वला भोसले, ज्योती शिंदे, रेखा पवार, लक्ष्मी होसुरे, पूर्वा मोरे, लक्ष्मी सूर्यवंशी, मिनाक्षी सूर्यवंशी, आरती सूर्यवंशी, मृदुला सूर्यवंशी, छाया पवार, तृप्ती बाबर धनश्री पाटील, कविता वाकडे, जयश्री माने, पल्लवी कदम यांच्यासह आदिजन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button