मोहोळ (प्रतिनिधी) माजी केंद्रीय गृहमंत्री तथा, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ शहर कॉंग्रेस कमिटी यांच्यावतीने आज रोजी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराचे उद्घाटन सोलापूर ग्रामीण (पूर्व) जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार यांच्या हस्ते करण्यात आले.
आजच्या सर्व रोग निदान शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी, तज्ञ डॉक्टरांकडून उपचार, रक्त तपासण्या तसेच; गरज असलेल्या रूग्णांसाठी पुढील उपचार आणि, काही आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय अनुदानित योजनांतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली गेली.
सदरील उपक्रमाला मोहोळ शहरातील आणि, तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच, शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबीराच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन मोहोळ शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर पवार यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आले होते.
यावेळी महिला कॉंग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षा अंजली वस्त्रे-भोसले, शहराध्यक्षा अंजली मोहिते, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष प्रवीण साळवे, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष केराप्पा गाढवे, सोशल मीडिया विभागाचे तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहोळ ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन वाळुंजकर, सहाय्यक अधीक्षक गणेश धोत्रे, बालाजी गवाड, मुजावर सर, ज्योती अष्टुळ, सामल मॅडम यांच्यासह आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचे सर्व रोग निदान शिबीरासाठी बहुमोल सहकार्य लाभले.
शिबीरादरम्यानच पक्षाच्या मागासवर्गीय सेलच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. गोरख चंदनशिवे यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी तर, दयानंद रणदिवे आणि अविनाश सोनवणे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा लाभ येथील सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहोचविण्याचा हा एक चांगला उपक्रम असल्याचे शिबीराच्या आयोजकांकडून इथे सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे तालुका सरचिटणीस पकरू बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याठिकाणी सुशिलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ह्या आरोग्य शिबिरातून ‘सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी’ आहे असा महत्त्वपूर्ण असा संदेश देण्यात आला.




