रुपये १,०१,५५०/- चा मुद्देमाल जप्त
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध जुगाराविरुद्ध कारवाई करत पोलिसांनी दिनांक २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. सुमारास दुधनी, ता. अक्कलकोट येथे कारवाई केली.
दुधनी नगरपरिषद परिसरातील एका गोदामाच्या बाजूला आडोशाला काही इसम पैशांचा हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून एकूण ११ इसमांना ताब्यात घेतले.
सदर कारवाईमध्ये जुगाराच्या ठिकाणावरून रोख रक्कम १५,५५० तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण १ लाख १ हजार ५५० रुपये- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम १२(अ) अन्वये अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईतील आरोपी : सिद्धार्थ संगमनाथ कोतली, वय २४ वर्षे , मौलासाब मदरसाब डफेदार, वय २५ वर्षे ,. परमेश्वर चंद्रकांत पादी, वय ४१ वर्षे , बसवराज महादेव पाटील, वय ३३ वर्षे , माळींगराय निंगप्पा पुजारी, वय २६ वर्षे ,. शिवशरण अर्जुन गायकवाड, वय ३८ वर्षे ,. गुरूशांत शिवप्पा जन्ना, वय ३० वर्षे ,. अंबादास लक्ष्मण गायकवाड, वय ३१ वर्षे , भिमाशंकर विठ्ठल चिनमळे, वय ३० वर्षे ,. राजकुमार इरण्णा येळके, वय ३६ वर्षे ,. उदयकुमार हणमंता पुजारी, वय ४६ वर्षे
सदरची कारवाई विनोद घुगे पोलीस निरीक्षक अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल माने, पोहेकॉ हरिदार सलगर, पोहेकॉ चव्हाण, पोकॉ रफिक बिराजदार यांनी केली असून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध यापुढेही प्रभावी कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अक्कलकोट दक्षिण पोलिसांकडून करण्यात आले आहे.






