Friday, September 4, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी व लेझर लाईट ला सक्त मनाई

Admin by Admin
September 4, 2026
in सामाजिक
0
श्री गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी व लेझर लाईट ला सक्त मनाई
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
“No DJ, No Dolby” उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन; पारंपरिक वाद्यांसह भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
आगामी श्री गणेशोत्सव-2026 शांततेत, उत्साहात व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून साजरा व्हावा, यासाठी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या वतीने आज दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी प्रियदर्शनी मंगल कार्यालय, कमलाराजे चौक, अक्कलकोट येथे गणेश मंडळांचे पदाधिकारी व शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीस . विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण; . राजेंद्र टाकणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट उपविभाग; . विनायक मगर, तहसीलदार, अक्कलकोट तसेच अक्कलकोट नगरपरिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग व MSEB चे अधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी असे अंदाजे ४०० ते ४५० नागरिक उपस्थित होते.
बैठकीमध्ये गणेशोत्सवासाठी आवश्यक परवानग्या वेळेत घेणे, मंडपामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, आक्षेपार्ह देखावे, बॅनर अथवा सामाजिक तेढ निर्माण करणारे साहित्य प्रदर्शित न करणे, तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, व्हिडिओ अथवा संदेश प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या “No DJ, No Dolby” या उपक्रमाच्या अनुषंगाने श्री गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान DJ/Dolbyचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. सार्वजनिक जबाबदारीचे भान ठेवून ध्वनिप्रदूषण टाळत शांततामय, भक्तिमय व आनंददायी वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
गणेश मंडळांनी गणेशमूर्ती व मंडपाच्या सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे बसवावेत, तसेच गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी मंडळातील सदस्यांची दिवस-रात्र २४ तास नियोजनबद्ध पद्धतीने नियुक्ती करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्तीने वर्गणी अथवा देणगीची मागणी करू नये. गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण, शालेय स्पर्धा, आरोग्य शिबिरे व इतर सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कायदेशीर नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन जातीय व धार्मिक सलोखा निर्माण होईल, अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारची अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या बाबींना थारा न देता शांतता व सुव्यवस्था राखावी, तसेच पोलिस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपस्थित गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांना करण्यात आले.
सदर बैठक शांततेत व उत्स्फूर्त वातावरणात पार पडली.
Previous Post

मराठा आंदोलनात GEN Z ची एन्ट्री! शाळकरी मुलींच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले; सरकारला गंभीर इशारा

Next Post

अक्कलकोट दक्षिण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट दक्षिण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अक्कलकोट दक्षिण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157961
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697