शैक्षणिक

संभाजीराव शिंदे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय इंचगाव, येथे शिक्षण महर्षी , समाजसेवक,स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांची जयंती साजरी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
संभाजीराव शिंदे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय इंचगाव, येथे शिक्षण महर्षी , समाजसेवक,स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांची ९० जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड 
. रमेश डोके  यांनी केली. 
त्यास अनुमोदन . पवन पाटील  यांनी दिले.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक . सिद्धार्थ जाधव  यांनी तात्या साहेबांच्या कार्याचे मर्म सांगून केले. 
विद्यार्थी मनोगत , शिक्षक मनोगत  कोटा  यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतानंतर जयंतीनिमित्त प्रशालेत  विविध स्पर्धांचा सप्ताह आयोजित केला होता. त्यामध्ये प्रथम, द्वितीय ,तृतीय विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मेडल देऊन गौरव करण्यात आला. सन २०२५-२६, इ.१० वी बोर्ड परीक्षा प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  इंचगाव गावचे माजी सरपंच तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष .तात्यासाहेब वराडे होते.प्रमुख पाहुणे
फेडरल बँकेचे शाखाधिकारी.शत्रुघ्न साळुंखे साहेब.
कामती पोलीस स्टेशनचे P.I. .बसवेश्वर जकीकोरे 
जि.प.प्रा. नूतन शालेय समिती अध्यक्ष .नानासाहेब तुकाराम डोके आदीची उपस्थिती होती. या कार्यक्रमास 
सर्व ग्रामस्थ व पालक वर्ग. सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली.. कार्यक्रमाचे निरीक्षक . मल्लाव यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली सुरवसे  व मनोज कुमार वाघमारे  यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार . नाईक नवरे  यांनी मानले..मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.       सर्व प्राविण्य मिळवलेल्या विध्यार्थ्यांचें कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे,उपाध्यक्ष आमदार देवेंद्र कोठे व खजिनदार नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button