सोलापूर
वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी , प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील शाळेचे छत कोसळून तेरा विद्यार्थी दोन शिक्षक जखमी झाले. संबंधितावर कारवाई करा या मागणीसाठी
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर आणि
शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर
यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनीकर यांच्याबरोबर वंचित पदाधिकाऱ्यांची जोरदार बाचाबाची झाली.
अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे छत कोसळून तेरा विद्यार्थी व दोन शिक्षक जखमी झाले. याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी ,कर्मचारी , ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल मिळावा त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळे कडून दुरुस्ती वेळ देखभालसाठी आतापर्यंत किती निधी उपलब्ध झालेला व कोणत्या कोणत्या शाळेला खर्च केलाय त्याचा अहवाल मिळावा. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत एकूण शिक्षक संख्या विद्यार्थी पटसंख्या किती आहे याचा अहवाल मिळावा. सोलापूर जिल्ह्यातील एकूण किती शाळा आहेत त्या सर्व शाळेचे इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून धोकादायक असलेले शाळा तुरंत दुरुस्ती करण्यात यावे. त्याचा अहवाल मिळावा याव्यतिरिक्त सर्व शाळांमध्ये पाण्याची सोय व शौचालयाची सोय करण्यात यावी अशा प्रकारची मागण्याची निवेदन आज देण्यात आले.
निवेदन देत असताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनेकर यांच्या उद्धट बोलण्याने काही काळ वंचित पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात वादावादी होऊन वातावरण अतिशय स्फोटक झालेले होते. याप्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे , शहर अध्यक्ष प्रशांत गोणेवार युवक शहराध्यक्ष महेश जाधव , युवक शहर सचिव नरेंद्र शिंदे , शहर महासचिव विनोद इंगळे , सुहास सावंत , शाहिद शेख , शरीफ शेख , अक्कलकोट तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे , दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख , विजय गायकवाड , विजयानंद उघडे , श्रीनिवासं संगेपान आदी उपस्थित होते.




