सामाजिक
अक्कलकोट नगरपालिका विश्वविक्रम स्थापन करणार, ऐन पावसाळ्यात शहराला सतरा दिवस आड पाणी पुरवठा – सूर्यकांत कडबगावकर

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – केवळ नियोजना अभावी अक्कलकोट शहराला ऐन पावसाळ्यात १७ दिवस आड पाणी येत आहे.असा प्रसंग ४० वर्षात कधी शहरवासीयान वर आले नव्हते.अक्कलकोट नगरपालिकेने विश्वविक्रम केला आहे असे वाटत आहे अशी उपरोधक टिका शिवसेना विधानसभा संघटक प्रा. सूर्यकांत कडबगावकर यांनी केली आहे.
१९९२ मधे कुरनुर पाणी पुरवठा योजना नव्हती तरीही त्यावेळच्या नगराध्यक्ष व त्यांच्या टिमने टॅंकर ने पाणी आणून ५दिवसा आड पाणी दिले. व शहरामधे अनेक ठिकाणी कुपनलिका (बोअर) मारुन पाणी उपलब्ध करुन दिले.आजची परिस्थिती वेगळी आहे. ,उजनी पुर्ण भरुन वाहत आहे एकरुख सिंचन योजने साठी कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी कुरनुर पर्यंत आणले. तरीही आज कुरनुर धरणात २०टक्के पाणी शिल्लक आहे. भिमा नदीचे पाणी वाहून कर्नाटक मधे जात आहे. ते पाणी एकरूप सिंचन योजने कडे का वळवले नाही , कुरनुर धरण का भरुन घेतले नाही. कुरनुर धरणावर अनेक गावांचे पाणी पुरवठा होतो व शेतीसाठी पाणी पुरवठा होतो तरीही का धरणात पाणी सोडले गेले नाही. कुरनुर धरण व त्यात पाणी आणलात म्हणुन पाणीदार झालात मग पावसाळ्यात कुरनुर धरण रिकामे का दिसत आहे.केवळ नियोजना अभावी असा प्रसंग शहर वासीयावर ओढावत आहे.हत्ती तलावातील पाणी विकास कामांसाठी काढून टाकण्यात आले.पावसाळ्यापुर्वी काम पूर्ण व्हायला पाहिजे ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरातील अनेक विहीरी आटुन गेले आहेत कुपनलिका बंद पडले आहेत.म्हणजे’ तुप ही गेल आणि माप ही गेलं’ अशी परिस्थिती झाली आहे.शहरातील पाण्याच्या टाक्याही अर्धवट बांधलेल्या आहेत.शहराचा विकास व्हायला हवा तसा प्रयत्नही होत आहे, परंतू त्याला वेळेचेही भान असायला हवा.परफेक्ट नियोजन असायला हवे. १७ दिवसा पर्यंत लोकांना पाणी मिळत नसेल तर हा दोष कुणाचा . लोकप्रतिनिधीचा का शासकीय अधिकाऱ्यांचा की निवडुन देणा-या मतदारांचा.पाणीपट्टी बिल ही वेळेवर देत नाहीत .तीन चार वर्षांचे बिल एकत्र देतात. तेही व्याज लाऊन . एकतरी पाणी पुरवठा सुरळीत नाही, बिल वेळेवर मिळत नाही,मि स्वतः अनेक वेळा याबद्दल तक्रार केली आहे पण त्याना काहिच फरक पडत नाही.उलट मलाच दोन हजार रुपये दंड लाऊन बिल दिले आहेत. म्हणजे “आंधळा दळतो आणि कुत्रा पिठ खातो” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अक्कलकोटची जनता खुप शांत आहे गेली चार दशके पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. रोज पाणी मिळणार याची वाट पहात आहेत. ते दिवस प्रत्यक्षात कधी येणार यासाठी एक हाती सत्ता दिले आहेत.लोकप्रतीनीधी नी अधिका-या कडुन कामे करून घेतली पाहिजे.जो निष्क्रिय आहे त्याला घरी पाठवले पाहिजे.शासन निधी द्यायला तयार आहे , अक्कलकोट साठी भरपूर निधी दिले आहे केवळ नीयोजना अभावी १७ दिवस आड पाणी मिळत आहे. अक्कलकोटची जनता शांत आहे , कधीच रस्त्यावर उतरले नाही. यांची तरी जाण ठेवून कामे केली पाहिजे. विकासासाठी आमचा विरोध नाही पण नियोजन शून्य असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्या शिवाय भाग नाही, हि वेळ यूऊ देऊ नका कारण आम्ही ही आपल्या बरोबर महाराष्ट्रात सत्तेत आहोत याचीही जाण तुम्हाला व आम्हाला ठेवावे लागेल. एकुणच इतर कामा पेक्षा रोज नाहीत निदान ५/६ दिवस आड पाणी कसे मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. नगराध्यक्ष,सिनीयर नगरसेवक यांनी आपल्या अधिकाराचा वापर नियोजना साठी करून अधिकारी वर्गाकडुन काम करुन घेतले पाहिजे. जनतेला अडचणीत आणू नका जनता खुश तर आपण खुश राहणार आहे हे लक्षात ठेवा असे प्रा सुर्यकांत कडबगांवकर विधानसभा संघटक शिवसेना अक्कलकोट यांनी म्हंटले आहे.




