खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसचे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने

सोलापूर –
भाजपच्या राजकीय फायद्यासाठी मतदार यादीत फेरफार करून वोटचोरी करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करून तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच त्यांच्या कार्यकाळात मतदार याद्यांमध्ये झालेल्या फेरबदलांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेटसमोर जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात संताप व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान ज्ञानेश कुमार यांच्या वेशभूषेतील व्यक्तीला प्रतीकात्मक बेड्या ठोकून निषेध करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की, काँग्रेस आज संपूर्ण देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात यावी. त्यांना ताबडतोब अटक करावी. ही आमची प्रमुख मागणी आहे.
मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपच्या राजकीय फायद्यासाठी मतदार यादीत फेरफार करून वोटचोरी केली. Form 6 मध्ये नियमबाह्य पद्धतीने बदल करण्यात आला. देशाचे नागरिक कोण आहेत हे ठरविण्याचे अधिकार नाही. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगातीलच दोन आयुक्तांनी काही निर्णयांवर आक्षेप नोंदविले. निवडणूक आयोगातीलच दोन आयुक्तांनी निर्णय प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवले असल्यामुळे ते कोणीही फेटाळू शकत नाही. निवडणूक आयोगाच्या आडून जर मतदारांच्या अधिकारांशी खेळ केला जात असेल, तर हा केवळ राजकीय पक्षाचा प्रश्न नाही; हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचा प्रश्न आहे. वोटचोरी म्हणजे केवळ मते चोरणे नाही; वोटचोरी म्हणजे देशाच्या लोकशाहीचा DNA बदलण्याचा, आत्मा बदलण्याचा प्रयत्न आहे. या देशाचा आत्मा संविधान, लोकशाही, सर्वधर्मसमभाव आणि प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार आहे. हा देश कोणत्याही एका पक्षाच्या किंवा विचारसरणीच्या आधारे चालणार नाही; हा देश संविधानाच्या आधारावर चालतो. पण हा देश RSS विचारसरणीचा बनविण्याचा घाणेरडा प्रयत्न मोदी अमित शहा ज्ञानेशकुमार यांच्याकड़ून होत आहे. संविधान आणि लोकशाहीचा आत्मा बदलण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस कधीही होऊ देणार नाही. पेपरलीकमुळे धर्मेंद्र प्रधान यांची विकेट गेली. दुसरी विकेट आत्ता ज्ञानेशकुमार यांची जाणार आहे. तिसरी विकेट कोणाची उडणार हे सर्वानाच माहीत आहे.
आज देशातील शेतकरी संकटात आहे, दुष्काळ जाहीर झाला पण त्याचा कोणताही उपयोग शेतकऱ्यांना होताना दिसून येत नाही त्यामुळे तो बोगस जी आर आम्ही जाळणार आहे. तसेच ट्रम्प तात्यांना खुश करण्यासाठी UPI सारखा मोठ्ठा राक्षस लोकांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे. सामान्य नागरिक त्रस्त आहे, युवक रोजगाराच्या प्रश्नाने त्रस्त आहेत. दुष्काळ, महागाई, बेरोजगारी यांसारखे गंभीर प्रश्न जनतेसमोर असताना निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांचा अधिकार अधिक महत्त्वाचा ठरतो. जनतेच्या मताचा अधिकारच सुरक्षित राहिला नाही, तर लोकशाही कशी सुरक्षित राहणार? SIR च्या प्रक्रियेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. देशातील मतदार याद्यांमधून चुकीच्या पद्धतीने १३ कोटींपेक्षा अधिक नावे वगळण्यात आली आहेत.
देशाचा आत्मा संविधान आहे, देशाचा आत्मा लोकशाही आहे आणि देशाचा आत्मा प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार आहे. हा आत्मा कोणीही बदलू शकत नाही आणि काँग्रेस तो बदलू देणारही नाही. ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपांची चौकशी झालीच पाहिजे, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि त्यांना ताबडतोब अटकही केली पाहिजे.
वोटचोरीविरोधातील काँग्रेसचा हा लढा जनतेच्या मताच्या अधिकारासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आहे, असे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात खासदार प्रणितीताई शिंदे, शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, भारत जाधव, प्रशांत साळे, सुलेमान तांबोळी, संदीप पाटील, किशोर पवार, अमोल भुमकर, सतीश पाचकुडवे, राहुल घुले, उपाध्यक्ष राजेश पवार, सुरेश हावळे, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी महापौर आरिफ शेख, कार्याध्यक्ष मनोजदादा यलगुलवार, शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सरचिटणीस अॅड. केशव इंगळे, श्रीशैल रणधिरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, उदयशंकर चाकोते, परशुराम सत्तारवाले, लक्ष्मीकांत साका, शिवशंकर अजनाळकर, अब्दुल खालिक मुल्ला, सेवादल शहर अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष जुबेरभाई कुरेशी, शकील मौलवी, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष सागर उबाळे, भटके विमुक्त जाती जमाती विभाग शहराध्यक्ष युवराज जाधव, विद्यार्थी संघटना अध्यक्ष शरद गुमठे, पृथ्वीराज नरोटे, गणेशअप्पा नरोटे, असंघटित कामगार कर्मचारी संघटना विभाग अध्यक्ष सुभाष वाघमारे, सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, उद्योग-वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, प्रवक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, झोपडपट्टी व जीर्णचाळी विकास अध्यक्ष बसवराज म्हेत्रे, शहर मध्य युवक अध्यक्ष वाहिद विजापूरे, यंग ब्रिगेड सेवादल अध्यक्ष विवेक कन्ना, शिक्षक सेल अध्यक्ष सुबोध सुतकर, माजी नगरसेवक दत्तूअण्णा बंडपट्टे, एन. के. क्षिरसागर, हरून शेख, हाजी मैनुद्दीन शेख, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचवडकर जाधव, अॅड. करीमोनिसा बागवान, सेवादल महिला शहराध्यक्ष रेखा बिनेकर, माजी नगरसेविका भारती ईपलपल्ली, नसीम खलिफा, आयाज आळंद, अंबादास गुत्तीकोंडा, प्रा. भोजराज पवार उपस्थित होते.



