सोलापूर

आमदार  सचिन कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी , सोलापूर पोलीस आयुक्तानां निवेदन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार . सचिन कल्याणशेट्टी यांचा परिवार दि. ७ ऑगस्ट ,- शुक्रवार रोजी सोलापूर शहरात गेले असता, महावीर चौक येथे दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्या वाहन चालका समोर  आमदार साहेबांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे.आमदार . सचिन कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.सोलापूर पोलीस आयुक्तानां यांना निवेदन देण्यात आले.
लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. सदर घटनेमुळे मा. आमदार महोदय तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला असून, या घटनेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेमागील खरे सूत्रधार व संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यात यावा. तसेच घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
तसेच, आमदार . सचिन  पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांच्या जीवितास असलेला संभाव्य धोका लक्षात घेता, त्यांना आवश्यकतेनुसार अधिकचे व पुरेसे पोलीस संरक्षण तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी सोलापूर पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी भाजपा मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील, सुनील खेड,अमोल हिप्परगी,महादेव पाटील, नगराध्यक्ष अंजली बाजारमठ, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड,युवा मोर्चा अध्यक्ष महेश बिराजदार , यशवंत धोंगडे, रामप्पा चिवडशेट्टी,महेश हिंडोळे, महेश इंगळे, शिवशरण जोजन, प्रविण शहा,नेताजी खंडागळे,विकास बुळा, सिद्धाराम शिवमूर्ती,सिद्धाराम हेले,प्रभाकर मजगे, सागर हिप्परगी , संदीप टिळे, गड्डू पटणे,सुरेश गड्डी, परमेश्वर यादवाड, लक्ष्मीकांत धनशेट्टी , कस्तुरा चौगुले, सुनंदा स्वामी, भागुबाई नागराज कुंभार, अप्पू पाटील, अपर्णा सिद्धे,महेश पाटील , भीमराव शेळके,बसवराज शेळके,शरण बंदिछोडे,अप्पू स्वामी,अप्पासाहेब किवडे, उत्तम वाघमोडे ,अविनाश मदीखांबे,सूरज पाटील , देविदास कवटगी,सद्दाम शेरिकर, नन्नू कोरबु, नवीद डांगे,विनोद मोरे , इराण्णा, भरमशेट्टी, विजयालक्ष्मी गवंडी,अतुल मेंकुदळे,अंजली शिरसाट ,शंकर भांजे ,अजीज शेख , रुद्रय्या स्वामी, बबलू कामनुरकर, शेखर कुंभार,नागराज होळीकट्टी सचिन स्वामी, संजय मोरे, दया बमनळी, निखिल सलगोंडा, सिद्धाराम जकापुरे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button