महाराष्ट्र

पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या परंडा तालुक्यातील तरुणाचे टोकाचे पाऊल

माझा मुलगा लाल दिव्याच्या गाडीत यायच्या ऐवजी अँब्युलन्स मध्ये आला माझे स्वप्न अपुरे राहिले प्रथमेशच्या  आईने फोडला हंबरडा

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )
पुण्यात एमपीएससीची (MPSC) तयारी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापूरी. येथील एका होतकरू तरुणानं टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख (वय २६) असं या दुर्दैवी तरुणाचं नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परंडा तालुक्यासह राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी पार्श्वभूमी आणि संघर्ष:
प्रथमेश गेल्या चार वर्षांपासून पुणे येथे राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एमपीएससीची तयारी करत होता. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याचे दाजी त्याला दरमहा ८ ते १० हजार रुपये पाठवायचे, त्यातून तो टिवीशन खाने पीने व् शिक्षण घेत होता. कौटुंबिक आर्थिक अडचणींमुळे त्याला अनेकदा उपाशीपोटी किंवा एका वेळच्या जेवणावर दिवस काढावे लागत होते. त्याच्या डोक्यावर दोन-अडीच लाखांचे कर्ज आणि उधारी झाली होती. ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला केवळ एवढ्याशा कर्जासाठी व रोजगाराच्या अभावामुळे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“लाल दिव्याच्या गाडीत येणार होता, पण…”
प्रथमेशच्या निधनानंतर त्याच्या आईचा व कुटुंबाचा टाहो काळीज पिळवटून टाकणारा आहे. “माझा मुलगा अधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीत घरी येणार होता, पण तो थेट अँबुलन्समध्ये आला,” अशी हंबरडा फोडत आईने दिलेली प्रतिक्रिया उपस्थितांचे डोlळे पाणावणारी ठरली. त्याच्या पश्चात आई आणि पाच बहिणी असा परिवार असून, वडिलांचे छत्र আগেই हरपले होते.
अभिजीत दीपके यांच्याकडून सांत्वन व आंदोलनाचा इशारा:
घटनेची माहिती समजताच CJP चे अभिजीत दीपके यांनी खासापूर येथे जाऊन प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांच्या व्यथा ऐकून अभिजीत दीपके देखील भावूक झाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, “हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे,” असा गंभीर आरोप केला. तसेच ग्रामीण भागातील तरुणांवर बेरोजगारीची वेळ आणणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षांच्या गोंधळाला जबाबदार असलेल्या या परिस्थितीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील रविराज साबळे यांनीही देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. परंडा पोलीस स्टेशनचे पीआय यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button