धार्मिक
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस आषाढी यात्रेत ८ कोटी ९२ लाखाचे उत्पन्न

पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी ८ कोटी ९२ लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या. आषाढ शुध्द ०१ (दिनांक १५ जुलै) ते आषाढ शुध्द १५ ( दिनांक २९ जुलै) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ७१४४०७८ रुपये अर्पण, २९३९७०७६ रुपये देणगी, ८३४७००० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४६३११०३ रुपये भक्तनिवास, २४०३२४०२ रुपये हुंडीपेटी, १५२७४४३ रूपये परिवार
देवता तसेच ९६७२९३७ रुपये सोने- चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून ४५२०४३९ इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ ७५०५२९१ रुपये अर्पण, २८८३३५६९ रुपये देणगी, ९४०४३४० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४५४१४५८ रुपये भक्तनिवास, १४४७१३४८ रुपये हुंडीपेटी, ३२४५६८२ रूपये परिवार देवता तसेच ३५९६१७६८ रुपये सोने-चांदी अर्पण,
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास भाविकांकडून दान
पश्चिमदार परमद्वार
तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून १२४५०७५ रुपये व ३ इलेक्ट्रिक रिक्षा / बस चे ३२ लक्ष इतके उत्पन्न प्राप्त झाले होते. सन २०२५ च्या आषाढी यात्रेत रू. १०८४०८५३१/- व या वर्षीच्या यात्रेत रू. ८९२७२४७८/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील
यात्रेच्या तुलनेत रू. १९१३६०५३/- इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगीतले.


