धार्मिक

हैद्रा दर्ग्याला सौर ऊर्जासाठी निधी दिलेला नाही : जनमेजयराजे भोसले

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील ख्वाजा पीर सैफुलमूलक चिस्ती दर्ग्याच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने २० लाख रुपयांचा निधी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. अन्नछत्र मंडळाने हैद्रा दर्ग्याला सौर ऊर्जासाठी  आर्थिक मदत न दिल्याचे जनमेजयराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने हैद्रा दर्गास सौर ऊर्जासाठी निधी दिल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे स्वामीभक्त, देणगीदार आणि नागरिकांमध्ये गैरसमज झाल्याचे त्यांनी सांगितले. हैद्रा दर्गा समितीकडून सौरऊर्जा प्रकल्पासाठी आर्थिक मदतीची मागणी केली होती. मात्र, मागणीसंदर्भात निर्णय झालेला नसताना अन्नछत्र मंडळाकडून मोठ्या रकमेची मदत देण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यामुळे वस्तुस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे जनमेजयराजे  भोसले यांनी नमूद केले.
सौरऊर्जा प्रकल्पासाठी मदतीची मागणी होणे आणि निधी मंजूर होऊन तो देण्यात येणे या दोन वेगळ्या बाबी असल्याचे सांगत जनमेजयराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाबाबत काही विघ्न संतोषी मंडळींनी हेतू पुरस्सर पणे हे वृत्त प्रसिद्ध केल्याचे सांगितले.
या पत्रकार परिषदेला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे आणि सचिव शामराव मोरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button