सामाजिक
कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांचे राजकीय,सामाजिक व शैक्षणिक कार्य वंदनीय – मुकुंद पत्की

कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम
अक्कलकोट : ( प्रतिनिधी )
कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी सामाजिक स्थैर्यापासून दूर गेलेल्या वंचित व उपेक्षित समाजातील नागरिकांना न्याय देण्याचे कार्य केले, तसेच सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेची स्थापना करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांनी शेतकरी, शेतमजूर यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून शासन दरबारी त्यांच्या समस्या मांडून वैयक्तिक लाभ देण्याचे कार्य केले. म्हणून समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी दिलेले योगदान वंदनीय आहे. असे प्रतिपादन जेष्ठ संचालक मुकुंद पत्की यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या सर्व शैक्षणिक शाखांच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, उपाध्यक्ष प्रा भीमराव साठे, सचिव मल्लिकार्जुन मसुती, ज्येष्ठ समाजसेवक सुरेश आण्णा फुटाणे उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की,
पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट शहर व ग्रामीण भागाच्या विकासाची त्यांनी पाहिलेली स्वप्ने कृतीत उतरविण्याचे कार्य त्यांचे सुपुत्र आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी करत आहे.
यावेळी मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, सीमावर्ती भागातील मुले, मुली शिकल्या पाहिजेत या भूमिकेतून त्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केली, वंचित व उपेक्षित समाजातील मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या मनात तळमळ होती. तसेच शेतकरी व शेतमजुरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ते अविरत झटत असत कुटुंबाबद्दल त्यांच्या मनात प्रचंड ओलावा होता, सर्वांनी समाजासाठी योगदान दिले पाहिजे असे ते नेहमी म्हणत असत, त्यामुळे त्यांच्या कार्याचा वारसा घेऊन आज आमच्या कुटुंबातील सर्वच मुले कार्य करत आहेत. यावेळी माजी मुख्याध्यापक बापूजी निंबाळकर व माजी पर्यवेक्षक खंडेराव घाटगे यानीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. तदनंतर पुण्यतिथीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली
यावेळी प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, माजी पर्यवेक्षक सूर्यकांत रूगे, पर्यवेक्षक सिद्रामप्पा पाटील,प्रा विश्वनाथ चव्हाण, श्रीदेवी मायनाळे, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक निशिगंधा सोमेश्वर यांनी केले, सूत्रसंचलन कल्पना स्वामी यांनी केले आभार मनीषा सुरवसे यांनी मानले.
चौकट –
कल्याणशेट्टी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम
दरम्यान कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मल्लिनाथ कल्याणशेट्टी, मुकुंद पत्की, मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक राजशेखर पवार, डॉ बाळासाहेब पाटील, डॉ शितल झिंगाडे उपस्थित होते.
स्वर्गीय पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या कार्यावर भित्तिपत्रकाचे प्रकाशन
सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने स्वर्गीय पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या कार्यावर भित्तिपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले भित्तीपत्रकातील उत्कृष्ट लेखास पारितोषिके देण्यात आली.




