सामाजिक
फोक आख्यान कार्यक्रमाच्या आविष्काराने अक्कलकोटकर गेले भारावून

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
फोक आख्यान’ हा सध्याच्या तरुण कलाकारांचा एक लोकप्रिय संच आहे, तो सध्या मराठी लोकसंगीताचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवत आहे. यामध्ये पारंपरिक वाद्ये, शाहिरी बाणा आणि लोककलेचा मेळ घालून अतिशय ऊर्जेने कथा सादर केल्या जातात. या चमूने आपल्या ठसकेबाज आवाजाने आणि सादरीकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. जुन्या लोककलांना त्यांनी आधुनिक काळाशी जोडून एक नवा “थाट” दिला आहे. आख्यानांमध्ये प्रामुख्याने संत, अवतारी पुरुष आणि देवदेवता यांची चरित्रे, तसेच पौराणिक कथांचा समावेश असतो. लोककलेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील इतिहास, शूरवीरांच्या गाथा आणि महाराष्ट्राच्या मातीतील भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आख्यान करत आहे. या घरंदाज लावणी, जात्यावरच्या ओव्या आणि भक्तीचा रसाळ आविष्काराने अक्कलकोटकर भारावून गेले होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, गुरुवार दि. २३ जुलै रोजी सायंकाळी ७.वा.१५ मी “फोक आख्यान” या कार्यक्रमाने पाचवे पुष्प संपन्न झाले.
दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सो.म.पा. महापौर- विनायक कोंड्याल, धनश्री विनायक कोंड्याल, सो.म.पा. आयुक्त सचिन ओंबासे, अस्मिता सचिन ओंबासे, प.पू. धनंजय पुजारी, सो.म.पा. नगरसेवक- अमोल बापू शिंदे, चंद्रशेखर रेड्डी, ओंकार पवार, सो.म.पा. नगरसेविका संगीताताई जाधव, मुकुंद अण्णा पंडित, पुणे, नीलकंठ सहकारी बँक अध्यक्ष – सी.ए. धनराज नोगजा, बँक ऑफ इंडिया झोनल मॅनेजर- मानस झा, गिरीष कणेकर उद्योजक सोलापूर, योगेश अहंकारी (आर्किटेक्ट), विश्वस्त- राजेंद्र लिंबीतोटे, सरपंच- नितीन चव्हाण, निहार आडकर, समीर लोंढे, इम्तीजात कमिशनर, राहुल भंडारी, दामोदर देवसानी, डॉ.विनायक बुदले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
“फोक आख्यान” ही महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशात रुजलेली एक प्रभावी लोकसंगीत आणि कथाकथनाची परंपरा आहे. यामध्ये संगीत, कथन आणि नाट्यमय अभिव्यक्ती यांचा मिलाफ साधून शौर्य, भक्ती आणि ऐतिहासिक कथांचे राकट पण तल्लीन करणारे सादरीकरण संपन्न झाले.
प्रारंभी मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
चौकट : –
या कार्यक्रमाप्रसंगी नियोजित महाप्रसाद गृहाच्या इमारतीचे सादरीकरण:-
नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत, भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होत आहे. या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. सध्या गेल्या नोव्हेंबर-२०२४ पासून सदरचे काम प्रगतीपथावर आहे, येत्या २ वर्षात हे महाप्रसादगृह भक्तांच्या सेवेत असणार आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. निहार आडकर,
साईसुश्रृत डेव्हलपर्स, पुणे
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, अनुयाताई संदिप फुगे,तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, हर्षवर्धन अमोलराजे भोसले, स्वामीनीराजे अमोलराजे भोसले,अनिता खोबरे, सरोजनी मोरे, स्वाती निकम, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, अक्षता खोबरे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, संतोष भोसले, मनोज निकम, शरणप्पा पुजारी, अरविंद शिंदे, प्रवीण देशमुख, प्रा.शरणप्पा आचलेर, अतिश पवार, निखील पाटील, शिवराज स्वामी, रोहित खोबरे, प्रवीण घाडगे, गोटू माने, सौरभ मोरे, ज्ञानेश्वर भोसले, सर्फराज शेख, कांत झिपरे, सिद्धेश्वर मोरे, बाबुराव कुलकर्णी, सायबण्णा जाधव, रोहित मोरे, बालाजी पाटील, संतोष फुलारी, श्रीशैल कुंभार, ओंकार पवार, किरण साठे, संकेत पवार, वैभव मोरे, अॅड. फहीम पिरजादे, विवेक जाधव, नितीन कोबन, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
सादरकर्ते दवंडी पुत्र – अभिजीत लोंढे, शुभम साळवी, सौरभ कापसे निर्मिती व्यवस्थापक : अमोल टापरे आणि शैलेश थोरात अधिकृत छायाचित्रकार : जयदीप इनामदार, दिवटा:- तेजस देवधर, साऊंड :- आदित्य करंबेळकर चित्रीकरण व प्रसारण व्यवस्थापक : सचिन पाटील कपडे पट:- तुकाराम कमठेवार रंग भूषाकार :-विशाल निघोल झिलकरि :- दीपक उकिरडे आणि विनायक उकिरडे (थेरवडि), रोहित डाके (मुंबई) सागर खवले, (जामखेड), लोक वाजंत्री मंडळ:- पृथ्वीराज देशमुख (आळंदी), अभिषेक नायबळ (आळंदी), ऋतुराज रास्ते (अकलूज), गौरव बत्तीसे (मालेगाव), नयन गतिर (नाशिक, इगतपुरी), विश्वजीत लोंढे (पिंपरी), अर्णव कोटकर,(सांगवी), मानस साखरपेकर (चिपळूण), कुंदन ठाकूर (मालेगाव),राजेंद्र साळुंके (चारकोप बोरिवली), लोक वाघ्या मुरळी मंडळ : ऋषीकेश रिकामे (नाशिक इंचुरगवळी), अनुजा देवरे (नाशिक), चंद्रकांत माने (शिरुर), ऋचा कुलकर्णी (अंबेजोगाई), आख्यान मुकादम :- रणजीत गुगळे (जामखेड) बांधणी, रचना आणि लमाण बंधु, ईश्वर अंधारे (जामखेड), मूळ संकल्पना आणि संगीत कारभारी हर्ष – विजय व सहकारी यांचा या कार्यक्रमात सहभाग होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी केले. 




