सोलापूर

दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनास करमाळा तालुका नागरी कृती समितीतर्फे पाठिंबा

करमाळा ( आयुब शेख )दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनास करमाळा तालुका नागरी कृती समितीतर्फे पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
देशात वारंवार होत असलेल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, नुकत्याच झालेल्या NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व केंद्र सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
डॉ. अमोल दुरंदे आणि ॲड. सविता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यात आला. आंदोलकांनी आरोप केला की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणारे शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांशी प्रशासनाने केलेल्या वागणुकीचाही निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. परीक्षाप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अश मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनात डॉ. जयंत कापडी, औदुंबर राजेभोसले, मानसिंग खंडागळे, अंगद देवकाते, आबासाहेब टापरे, स्वप्निल जाधव, शंकर कुलकर्णी, डॉ. सुजीत शिंदे, ॲड. कोमल गोरे, ॲड. स्वाती सपकाळ, ॲड.योगेश शिंपी, ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. सौरव शिंपी यांच्यासह करमाळा परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button