श्रावण पाटील भिलवंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; दिवसभर निवासस्थानी मान्यवरांसह नागरिकांची गर्दी

नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजीम नरसीकर )
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती तसेच नरसी येथील श्री तुळजाभवानी जिनिंग संस्थेचे चेअरमन श्रावण पाटील भिलवंडे यांचा वाढदिवस रविवार (दि.१९ जुलै) रोजी अभूतपूर्व उत्साह, जल्लोष आणि जनसामान्यांच्या उत्स्फूर्त सहभागात साजरा करण्यात आला. दिवसभर त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छुकांची अक्षरशः रीघ लागली होती. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, कार्यकर्ते,मित्रपरिवार आणि असंख्य नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देतात श्रावण पाटील भिलवंडे ,यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव, पुष्पहार, पुष्पगुच्छ आणि सत्काराने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.श्रावण पाटील भिलवंडे यांनी अनेक वर्षांपासून राजकारण, सहकार आणि समाजकारण या क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करत जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पक्षाने सोपविलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे पार पाडली आहे. कार्यकर्त्यांना बळ देणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि विकासाभिमुख विचारसरणी जोपासणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील विकासकामे, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांना संधी उपलब्ध करून देणे, सामाजिक सलोखा कायम ठेवणे आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची वैशिष्ट्ये मानली जातात. कोणत्याही व्यक्तीची अडचण समजून घेऊन तिला शक्य ते सहकार्य करण्याची त्यांची कार्यपद्धती असल्याने समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांनी विश्वासाचे अढळ स्थान निर्माण केले आहे.
आपुलकीचा स्वभाव, संयमी नेतृत्व, दिलदार वृत्ती आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची जीवनशैली यामुळे श्रावण पाटील भिलवंडे यांच्याविषयी नागरिकांमध्ये विशेष आत्मीयता आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त झालेला जनस्नेह हा त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीची आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याची साक्ष देणारा ठरला.
यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक श्रीनिवास पाटील चव्हाण, दत्ता पाटील होटाळकर, प्रा. समदानी शेळगावकर, माधव पाटील घाटोळे, रंजीत देशमुख, पोलीस पाटील इब्राहिम बेग,माजी सरपंच गजानन पाटील भिलवंडे, सुधाकर पाटील बावणे, गंगाधर वडगावे, ज्येष्ठ पत्रकार राम तरटे, बाळासाहेब पांडे, मुख्याध्यापक नंदकिशोर टोकलवाड, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग नागेश्वर, धनराज शिरोळे,ग्राम पंचायत सदस्य राजेश वडगावे. ग्राम पंचायत माजी सदस्य रामभाऊ खनपटे, हाजी मुबारक शेख.,रमेश वासरे ,कैलास पांचाळ, सय्यद खलील सेठ,दिलीप पाटील पांढरे,गंगाधर भेदे, शंकर तमनबोईनवाड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, मित्रपरिवार आणि असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून आणि पुष्पगुच्छ अर्पण करून श्रावण पाटील भिलवंड,यांच्याप्रती असलेला स्नेह व्यक्त केला. अनेकांनी त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी सामाजिक-राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. दिवसभर सुरू असलेल्या शुभेच्छा भेटी, मान्यवरांचा सहभाग आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा वाढदिवस केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता लोकसहभागाचा आणि जनविश्वासाचा उत्सव ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


