Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

टीईटी प्रश्नी संसदेत आवाज उठविणार —  खासदार प्रणिती शिंदे

Admin by Admin
July 17, 2026
in शैक्षणिक
0
टीईटी प्रश्नी संसदेत आवाज उठविणार —  खासदार प्रणिती शिंदे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरात शिक्षक म्हणून सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण मिळाले पाहिजे हिच आपली भूमिका असल्याची नि:संदिग्ध ग्वाही खा. कु. प्रणिती शिंदे यांनी दिली.
           महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने आज सायंकाळी उशिरा या प्रश्नी खा. प्रणिती.शिंदे यांची भेट घेऊन याबाबतीत निवेदन देऊन चर्चा केली. दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निवड्यामुळे यामुळे इयत्ता १ ली ते ८ वी साठी ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना टीईटी सक्तीची करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने RTE २००९ मधील कलम २३ (२ ) मध्ये व दुरुस्ती करावी व NCTE अधिसूचनेत बदल करुन कार्यरत शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
       यावेळी खा. शिंदे यांनी यापूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्रव्यवहार केला असून २० जुलै पासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नी आवाज उठवणार असून यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. 
         यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, जिल्हाध्यक्ष अमोघसिद्ध कोळी, राज्य प्रसिद्धीप्रमुख डॉ. रंगनाथ काकडे, शिक्षक नेते सुरेश पवार, कन्नड विभागाचे राज्यप्रमुख बसवराज गुरव, सरचिटणीस शरद रुपनवर, ज्येष्ठ नेते हमजूभाई मुलाणी इत्यादी पदाधिकारी व सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळवून देण्यासाठी टेंभुर्णी काँग्रेस आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

Next Post

चपळगांव गटातील गावांसाठी हन्नुरमध्ये लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची सहविचार सभा

Admin

Admin

Next Post
चपळगांव गटातील गावांसाठी हन्नुरमध्ये लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची सहविचार सभा

चपळगांव गटातील गावांसाठी हन्नुरमध्ये लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची सहविचार सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157422
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697