माजलगाव–तेलगाव रस्त्यावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू!
बस आणि कारची समोरासमोर धडक; परिसरात हळहळ व्यक्त
माजलगाव / बीड ( नाजेर कुरेशी ) : माजलगाव–तेलगाव रस्त्यावर बस आणि कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन पाच व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची तीव्रता अत्यंत भयानक असल्याने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी प्रशासन आणि शासनाने ठोस उपाययोजना कधी करणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शासनाचे डोळे कधी उघडणार?
रस्ते अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय पावले उचलत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.


