राजकीय

“यांची जहागिरी संपली, सोलापूरच्या जनतेने उत्तर दिलं” ; आमदार सचिन कल्याणशेट्टींचे मोहिते पाटलानां उत्तर 

 

सोलापूर : सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंत नाना देशमुख यांना धूळ चारली. या या निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी असाच सामना रंगल्याचे पाहायला मिळाले.

एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका सुद्धा झाली. उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या वतीने खासदार धर्यशील मोहिते पाटील यांनी आव्हान दिले होते. निवडणूक लागलेल्या दिवशीच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मोहिते पाटलांचे नाव न घेता ज्यांच्यामुळे ही निवडणूक लागली त्यांना आम्ही धडा शिकवू अशी भाषा केली होती.

त्यानंतर मतदानाच्या दिवशी प्रतिक्रिया देताना सचिन कल्याणशेट्टी यांनी विरोधकांवर अदृश्य होण्याची वेळ आली त्यांचा इगो या निवडणुकीनंतर संपून जाईल सिद्धेश मोहिते पाटलांना आव्हान दिले होते.
यावर आधारित मोहिते पाटील यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर बोचरी टीका करताना ते राजकारणात लहान आहेत, लहान मुलांच्या तोंडून असे शब्द निघून जातात अशा शब्दात तोंड सुख घेतले होते.

दरम्यान राजेंद्र राऊत यांचा विजय झाल्यानंतर विजय जल्लोष करताना आमदार कल्याण शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली विरोधकांची जहागिरी आता संपली आहे, त्यांच्या इगो ला या जनतेने जागा दाखवून दिले आहे. हे लोक अजूनही सरंजामशाही, वतनदार, जहागिरशाही अन् मालकीच्या भूमिकेत आहेत, यांना वाटले की मालकी आमच्या आहे पण या जिल्ह्यातील जनतेने त्यांची जागा दाखवली आता कुठलीही जागीरदारी राहिलेली नाही ही लोकशाही आहे.

दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील म्हेत्रे -कल्याणशेट्टी नवे पर्व सुरू होणार का? यावर त्यांनी कल्याणशेट्टी आणि म्हेत्रे यांचे पर्व सुरू होईल का माहित नाही, पण हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे यश आहे माझा पक्ष आणि माझा नेता जिथे जिथे महायुती सोबत राहायला सांगतील, तिथे आम्ही सोबत राहू, जे जे प्रामाणिक असतील त्यांना सोबत घेऊन जाऊ अशी प्रतिक्रिया दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button